Saturday, July 6, 2024

एवढं सगळं झाल्यानंतर समजलं, आर्यन त्या क्रूझ शिपमध्ये नव्हताच; तरीही का केली अटक? घ्या जाणून

शनिवारपासून (२ ऑक्टोबर) अडचणींमध्ये असलेल्या आर्यन खानबाबत आता एक मोठा खुलासा झाला आहे. ज्या क्रूज शिपमधून त्याला पकडण्यात आलं असल्याचं तुम्ही अनेक वृत्तांमध्ये ऐकलं, परंतु तो त्या क्रूज शिपमध्ये नव्हताच. मग तरी देखील त्याला अटक का केली गेली?, आणि मुळात त्याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये अधिक वाढ का करण्यात आली?, तसेच सोमवारी कोर्टामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समोर आल्या?, या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूया…

आर्यन खानला रविवारची (३ ऑक्टोबर) रात्र एनसीबीच्या कोठडीत काढावी लागली. त्यांनतर सोमवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे आणि सरकारी वकिलांमध्ये शाब्दिक युक्तिवाद करण्यात आले. या दरम्यान एनसीबीच्या वकिलांनी एक मोठा खुलासा केला आणि साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. ते म्हणाले की, “आर्यन हा क्रूझवर नव्हता. आम्ही तिथे पोहोचण्याआधीच तो आम्हाला बाहेरच्या आवारात भेटला होता. तिथेच संशयास्पद वाटत असल्याने त्याला पकडण्यात आले होते. तसेच त्याच्याकडे आम्हाला कोणतेही अंमली पदार्थ मिळालेले नाही, पण त्याने अंमली पदार्थांचे सेवन केले आहे.”

या सर्वांवर आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे म्हणतात की, “तो त्या क्रूझवर नव्हता. त्याच्याकडे कोणतेही अंमली पदार्थ सापडले नाहीत. तो इतर ८ आरोपींना देखील ओळखत नाही. त्याच्या मित्राने त्याला तिथे बोलवले म्हणून तो तिकडे आला होता.” असे सर्व युक्तिवाद करत सतीश मानेशिंदे यांनी आर्यनला जामीन मिळावा असे सांगितले.

यावर एनसीबीचे सरकारी वकील यांनी त्यांची बाजू मांडत म्हणाले की, “त्याच्याकडे अंमली पदार्थ मिळाले नसले, तरीही त्याने त्याचे सेवन केले आहे. तसेच त्याच्या फोनमध्ये आम्हाला काही चॅट सापडल्या आहेत. त्यासाठी त्याच्या कोठडीमध्ये ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात यावी.”

त्यांच्या या चॅटमधील आरोपावर सतीश मानेशिंदे असे म्हटले की, “परदेशात असताना त्याने काही व्यक्तींबरोबर संवाद साधला होता. त्यामुळे त्या चॅटचा संबंध आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांप्रकरणी लावला जात आहे.”

अखेर एनसीबीने या सर्व प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे शोधून काढण्यासाठी त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी मागितली, परंतु न्यायालयाने त्याला आता तीन दिवस म्हणजेच ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय काय घडेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्वशी रौतेलाच्या हवेत उडणाऱ्या केसांनी चाहत्यांना केले घायाळ; अदा पाहून नेटकरी म्हणाले, ‘उफ्फ!’

-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

हे देखील वाचा