अभिनेते प्रकाश राज नुकतेच एका अपघातानंतर रुग्णालयात दाखल झाले होते. प्रकाश राज यांना खांद्याला दुखापत झाली होती. त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती आता ठीक आहे. रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रियेनंतर प्रकाश राज यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करून तब्येतीची माहिती दिली आहे.
प्रकाश यानी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या फोटोमध्ये ते हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेले दिसत आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हसू स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर पट्ट्या बांधल्या आहेत. या सेल्फीमध्ये चेहऱ्यावर मोठ्या हसूसह प्रकाश यांचा चेहरा खूपच चांगला दिसत आहेत.
प्रकाश यांनी हा फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, “द डेव्हिल इज बॅक… यशस्वी शस्त्रक्रिया… धन्यवाद प्रिय मित्र डॉ गौरव रेड्डी आणि तुमच्या सर्व प्रेमासाठी आणि प्रार्थनांसाठी खूप खूप धन्यवाद. लवकरच पुन्हा एक्शनमध्ये दिसेल.”
यापूर्वी प्रकाश राज यांनी स्वतः त्यांच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती देताना प्रकाश राज यांनी ट्वीट केले होते की, “एक छोटा अपघात… लहान फ्रॅक्चर… शस्त्रक्रियेसाठी हैदराबादमध्ये माझे मित्र डॉ. गौरव रेड्डी यांच्या सुरक्षित हातात जात आहे. मी लवकरच ठीक होईल, काळजी करायचे काही कारण नाही. माझ्यासाठी प्रार्थना करा.” या बातमीनंतर त्यांचे चाहते चिंतित झाले होते. त्याचबरोबर त्यानं लवकर बरं वाटावं म्हणून सतत प्रार्थना देखील करत होते.
प्रकाश राज यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये आपले नाव मिळवले आहे. त्यांनी ‘अटॅक’, ‘मुकुंद’, ‘वॉन्टेड’, ‘एंटरटेनमेंट’, ‘दबंग 2’ आणि ‘सिंघम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते लवकरच मणिरत्नमच्या ‘पोन्नीयन सेल्वन’ या चित्रपटात दिसणार आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेत्री सारा अली खानने पॅपराजींसोबत साजरा केला तिचा वाढदिवस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
-आमिर काढत होता कियाराचा अडकलेला मास्क; पण नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल, म्हणाले…