अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यानंतर तेथील महिलांना खूप काही सहन करावे लागत आहे. जगभरातील लोक अफगाणिस्तानच्या महिलांसाठी चिंता व्यक्त करत आहेत. तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर अफगाणी नागरिकांना आपला देश सोडणे भाग पडत आहे. अनेक लोक दुसऱ्या देशात जाऊन त्याठिकाणी आश्रय घेण्याच्या प्रयत्नात आहेत. तालिबानी येताच तिथल्या महिला आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध अफगाणी चित्रपट निर्माती सहारा करीमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतोय.
काबुल रस्त्यांवर धावताना दिसली सहारा करीमी
सहारा करीमीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून लोक तिच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. या व्हिडिओमध्ये ती काबुलच्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सहारा करीमी अफगाणिस्तानमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सांगत आहे. (after taliban attack afghanistani film maker sahraa karimi running in kabul video goes viral on social media)
बॅंकेच्या बाहेर झाला गोळीबार
निर्माती सहारा करीमीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत, अफगाणिस्तानच्या परिस्थितीची झलक दाखवली आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती काबुलच्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सहारा करीमीने सांगितले की, १५ ऑगस्ट रोजी ती बँकेत पैसे काढण्यासाठी आली होती. पण बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही तिला पैसे मिळाले नाहीत. दरम्यान, बँकेबाहेर गोळीबाराचा आवाज आला आणि बँकेच्या एका व्यवस्थापकाने तिला तातडीने निघून जाण्यास सांगितले.
https://www.instagram.com/tv/CSlhhninJoW/?utm_source=ig_web_copy_link
मागचा दरवाजा खोलून काढले बाहेर
तिने या व्हिडिओमध्ये असेही सांगितले की, व्यवस्थापकाने त्यांना सांगितले की तालिबानी खूप जवळ आले आहेत. म्हणून त्यांनी शक्य तितक्या लवकर तिथून निघून जावे. करीमीच्या म्हणण्यानुसार, यानंतर बँक मॅनेजरने मागचा दरवाजा उघडून तिला बाहेर काढले आणि ती तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली.
सध्या कीवमध्ये आहे सहारा करीमी
अफगाणिस्तानातील अनेक रहिवासी तालिबानच्या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये आश्रय घेत आहेत. अशा परिस्थितीत, सहारा करीमी त्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे, ज्यांनी तालिबान्यांच्या कचाट्यातून जीव वाचवून अफगाणिस्तानातून पळ काढला आहे. चित्रपट निर्माती सहारा करीमी सध्या युक्रेनची राजधानी कीवमध्ये आहे.
सहारा करीमीने लिहिले पत्र
सहारा करीमीने अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर खुले पत्र लिहिले आहे. ज्यात तिने लिहिले आहे की, अफगाणिस्तानच्या सद्य परिस्थितीवर डॉक्यूमेंटरी केली पाहिजे. जेणेकरून संपूर्ण जग पाहू शकेल की अफगाणिस्तानचे रहिवासी कोणत्या प्रकारच्या वेदना सहन करत आहेत. या पत्रात सहारा करीमीने जगभरातील चित्रपट समुदायाला तालिबानच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. सहारा करीमी एक चित्रपट दिग्दर्शक तसेच अफगाण चित्रपट संघटनेची पहिली महिला अध्यक्ष आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम
-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी