Friday, July 5, 2024

घटस्फोटाच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच समंथा दिसली ‘तेलुगु केबीसी’मध्ये, म्हणाली ‘मी खूप नर्वस आहे’

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने या महिन्याच्या सुरुवातीला पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सर्वानाच मोठा धक्का बसला. या घटस्फोटाच्या घोषणेनंतर ती पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसणार आहे. लोकप्रिय अभिनेता ज्युनियर एनटीआर सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या तेलुगु वर्जनमध्ये समंथा गेस्ट म्हणून दिसणार आहे. या शोचे तीन सीझन तिचे पूर्वीचे सासरे असणाऱ्या नागार्जुन यांनी होस्ट केले होते.

जेमिनी टीव्हीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या भागाचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्युनियर एनटीआर शोमध्ये समंथा रूथ प्रभू यांचे स्वागत करतो. शो दरम्यान, समंथा म्हणते की, ती थोडी टेन्शनमध्ये आहे. ज्युनियर एनटीआर म्हणतो की, हे व्हायलाही पाहिजे, कारण ती हॉट सीटवर बसली आहे. ज्युनियर एनटीआर विनोदाने म्हणतो की, “इतर स्पर्धक शोमध्ये १००० ते १ कोटी रुपयांपर्यंत कमावतात. तू तर आधीच लक्षाधीश आहे. परंतु तिची सुरूवात १००० रुपयांपासून आहे.” शोचा हा विशेष भाग १४ ऑक्टोबर रोजी प्रसारित होईल.

https://www.instagram.com/p/CU2DX7eBqe0/?utm_source=ig_embed&ig_rid=8fec981a-ea19-4a8c-9c97-b9ed6981132e

समंथा आणि नागा यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला विभक्त होण्याची घोषणा केली. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना पोस्ट लिहून घटस्फोटाची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “बऱ्याच विचारविनिमयानंतर मी आणि नागा यांनी पती -पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे खूप भाग्यवान आहोत की, मैत्री हा एक दशकाहून अधिक काळ आमच्या नात्याचा मुख्य भाग होता, आम्हाला खात्री आहे की, आमच्यामध्ये एक खास बंधन राहील. आम्ही आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला पाठिंबा द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी आवश्यक गोपनीयता द्या.” अभिनेते नागार्जुन समंथाचे एक्स सासरे यांनीही समंथा आणि नागाच्या घटस्फोटाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा