थलापति विजय यांची शेवटची मानली जाणारी फिल्म ‘जना नायकन’ सध्या जोरदार चर्चेत आहे. मात्र, या चित्रपटाची रिलीज सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. ही माहिती बुधवारी फिल्मच्या प्रोडक्शन हाऊस KVN प्रॉडक्शन्स यांनी दिली होती. सर्टिफिकेट मिळण्यात झालेल्या विलंबामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, 9 जानेवारी 2025 रोजी ‘जना नायकन’ला (Jana Nayagan)CBFC कडून UA 16+ सर्टिफिकेट मिळालं आहे. मात्र, तरीही चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. UA कॅटेगरीतील चित्रपट सर्व वयोगटांसाठी खुले असतात, पण त्यावर काही अटी लागू असतात. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतोय की हा चित्रपट लहान मुलं पाहू शकतात का?
‘जना नायकन’ला मिळालेलं UA 16+ सर्टिफिकेट याचा अर्थ असा की 16 वर्षांखालील प्रेक्षकांनी हा चित्रपट पालकांच्या देखरेखीखालीच पाहावा. मुलांना चित्रपट पाहण्यास पूर्णतः बंदी नाही, मात्र पालकांनी त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे. कारण या चित्रपटात गंभीर राजकीय विषय, संवाद किंवा काही प्रसंग असू शकतात, जे लहान मुलांसाठी योग्य नसू शकतात. 16 वर्षांवरील प्रेक्षक मात्र कोणत्याही अडथळ्याविना चित्रपट पाहू शकतात.
मद्रास हायकोर्टाने CBFC ला थलापति विजय यांच्या ‘जना नायकन’ला UA सर्टिफिकेट देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून सर्टिफिकेट देण्यात होत असलेल्या विलंबाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करत कोर्टाने हा निर्णय दिला. यामुळे आता चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे.
एच. विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘जना नायकन’मध्ये थलापति विजयसोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, मामिथा बैजू आणि मोनिशा ब्लेसी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. जगदीश पलानीसामी, लोहित एन.के. आणि वेंकट के. नारायण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजकीय अॅक्शन ड्रामाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? एपी ढिल्लोंमुळे तुटलं नातं










