बऱ्याच महिन्यांनी चित्रपटगृहांमध्ये अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद पाहून अनेक निर्माता दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील जाहीर केल्या आहे. यात अनेक मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांसोबतच नवोदित कलाकारांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर होत आहे. यात सुनील शेट्टीचा मुलगा असलेल्या अहान शेट्टीच्या चित्रपटाचा देखील समावेश आहे.
https://www.instagram.com/p/CS8pVFHKqNU/?utm_source=ig_embed&ig_rid=ba93b4de-2a78-4231-a8bf-62a2ef482b59
अहान शेट्टी आणि तारा सुतारिया अभिनित ‘तड्प’ हा सिनेमा येत्या ३ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याची माहिती नाडियाडवाला ग्रँडसन यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून देण्यात आली आहे. मिलन लुथारिया यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा नाडियाडवाला ग्रँडसन प्रॉडक्शनच्या बॅनर अंतर्गत तयार झाला आहे.
या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मोठ्या पडद्यावर चित्रपटाची जादू बघण्यासाठी तयार राहा. साजिद नाडियाडवाला यांचा तडप सिनेमा ३ डिसेंबर २०२१ ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही एक अविश्वसनीय प्रेम कहाणी असून, तिला मिलन लुथारिया यांनी दिग्दर्शित केली आहे.” तर अहान शेट्टीने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हीच पोस्ट शेअर केली आहे.
Witness this magic on the big screen ✨#SajidNadiadwala’s #Tadap – An Incredible Love Story in cinemas on 3rd December 2021 ???? Directed by @milanluthria #AhanShetty @TaraSutaria @rajatsaroraa @ipritamofficial @foxstarhindi @WardaNadiadwala #FoxStarStudios
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) August 24, 2021
मागील काही दिवसांपासून हा सिनेमा सतत चर्चेत आहे. सुरुवातीला २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट कोरोनामुळे पुढे ढकलला गेला. ‘तडप’ हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘आरएक्स 100’चा हिंदी रिमेक आहे. तेलगू सिनेमात कार्तिकेय गुम्माकोंडा, पायल राजपूत, राव रमेश, रामकी आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. आपल्या मुलाच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सुनील शेट्टी खूपच उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील शेअर केले होते.
https://www.instagram.com/p/CL5y6I5gXsd/
अहान काही दिवसांपूर्वीच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तान्या श्रॉफसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसला होता. तान्या आणि अहान बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहे. तान्या जरी बॉलिवूडमधून नसली तरी ती शेट्टी कुटुंबाच्या खूप जवळ आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ
-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर
-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर