अभिनेता सुनील शेट्टी हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनेक चित्रपटांची आजही चर्चा होताना दिसते. अनेक दर्जेदार चित्रपटात त्याने काम केले आहे. मात्र, सगळ्यात जास्त गाजलेला चित्रपट म्हणजे धडकन आणि बॉर्डर. या चित्रपटांमुळे सुनील शेट्टीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीने त्याच्या वडिलांच्या या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सन १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला ऑल टाईम ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे ‘बॉर्डर’. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित चित्रपट होता. त्याच्या वडिलांच्या या चित्रपटाबद्दल बोलताना अहान (Ahan Shetty) म्हणाला, “मला बॉर्डर चित्रपट आवडतो. म्हणून मला वाटते की ‘बॉर्डर’चा भाग बनण्यासाठी तो एक उत्तम चित्रपट असेल. मला वाटते की, या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणे खूपच आनंद देणारे असेल.”
त्याचबरोबर त्याने आपल्या वडिलांच्या धडकन चित्रपटातही काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘बॉर्डर’ (Border) चित्रपटाने त्या काळात प्रत्येकाला देश प्रेमाची जाणीव करून दिली होती. आजही हा चित्रपट पडद्यावर पाहताना अंगावर काटा उभा राहतो. यामध्ये सुनील शेट्टी, सनी देओल असे अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनी काम केले आहे.
हेही पाहा- ‘या’ Tollywood कलाकारांच्या अभिनयाला तोडच नाही, Bollywood मध्येही दाखवलाय जलवा
सन २००० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘धडकन’ (Dhadkan) या सुपरहिट चित्रपटात सुनील शेट्टीसोबत शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटातील गाण्यांनी त्या काळात तरुणाईला वेड लावले होते. यामुळेच या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा अहान शेट्टीने व्यक्त केली आहे. या चित्रपटाचे आजही असंख्य चाहते आहेत.
‘धडकन’ चित्रपटातील गाणी आणि सुनील शेट्टीच्या अभिनयाचे त्या काळात खूप कौतुक करण्यात आले होते. चित्रपटात सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांची सुंदर प्रेमकथा दाखविण्यात आली होती. दरम्यान अहानने मागच्या वर्षी ‘तडप’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्याच्याकडे सध्या चार चित्रपटांच्या ऑफर असल्याचेही त्याने सांगितले. सोबतच भविष्यासाठी अनेक सुंदर योजना आखल्याचा खुलासाही त्याने यावेळी केला.
हेही वाचा-