बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच त्याच्या आगामी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अहान शेट्टीच्या ‘तडप’ या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी (२७ ऑक्टोबर) प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. सुनील शेट्टीप्रमाणे आता त्याचा मुलगा देखील बॉलिवूड गाजवणारा अशी चर्चा सुरू आहे.
‘तडप’ या चित्रपटामध्ये अहान झळकणार असल्याची माहिती या आधीच तारा सुतारियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये अहान शर्टलेस दिसत होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली होती.
ट्रेलरविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये एक रोमँटिक स्टोरी दिसत आहे. तसेच खूप सारा ड्रामा आणि ॲक्शन देखील पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले आहे. तसेच अहान आणि तारा यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर हा पहिला मोठा आणि रोमँटिक चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण यामध्ये असलेली रोमँटिक स्टोरी आणि ॲक्शन थोडे वेगळ्याच लेव्हलचे आहेत. तसेच चित्रपटाची गाणी देखील मनाला स्पर्श करणारी आहेत. अहानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा एक पोस्टर फोटो देखील शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर काही जखमा दिसत असून तो अभिनेत्रीसह रोमान्स करताना दिसत आहे.
सुनील शेट्टीच्या मुलीने या आधीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. साल २०१५ मध्ये आलेला चित्रपट ‘हिरो’ हा अथिया शेट्टीचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर ती ‘मोतीचूर चकनाचूर’, ‘नवाबजादे’ या चित्रपटांमध्ये झळकली होती. तसेच सुनील शेट्टीचा मुलगा अहानचा ‘तडप’ हा पहिलाच चित्रपट आहे.
चाहत्यांप्रमाणेच सुनील शेट्टीला देखील मुलाच्या पहिल्या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्वशी रौतेलाची जादू पाहिली का? हवेत लटकताना दिसली काकडी; पाहून तुम्हीही व्हाल हैराण
-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…
-कॅन्सरवर उपचार सुरू असताना महेश मांजरेकरांनी केले होते ‘अंतिम’चे शूटिंग