Saturday, June 29, 2024

‘पतली कमरिया…’म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी साडीमध्ये लगावले जोरदार ठुमके, व्हिडिओ झाला व्हायरल

मराठी सिनेसृष्टीमधील अभिजात सौंदर्याची खाण म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. पन्नाशीनंतर देखील त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा चार्म अबाधित आहे. आजच्या पिढीतील अभिनेत्रींना त्या फिटनेस आणि सौंदर्यात जोरदार टक्कर देत असतात. आजच्या काळातील सर्वच तरुणतरुणी त्यांच्यावर फिदा असून, त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसतात. अभिनयात अतिशय सरस असणाऱ्या ऐश्वर्या सोशल मीडियावरही तुफान सक्रिय आहे. त्या सतत त्यांचे वेगवेगळ्या लूकमधले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत लाईमलाइट खेचताना दिसतात. सध्या देखील त्याचा असाच एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ऐश्वर्या नारकर यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या ‘पतली कमरिया मेरी…तिरची नजरिया’ या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या गुलाबी साडीमध्ये जोरदार ठुमके लगावत असून त्यांना पाहून त्यांचे सहकलाकार देखील त्यांना पाहून जोरदार टाळ्या वाजवत आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडेने ‘आम्ही वेडे नाही फक्त आनंदी आहोत’ असे म्हणत हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर मराठी इंडस्ट्रीमधील अनेकांनी कमेंट्स करत ऐश्वर्या यांचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

ऐश्वर्या याचे वय ५२ वर्षे असून, वयाची पन्नाशी उलटून त्यांच्या फिटनेस तरुणाईलाही लाजवणारा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शेअर केलेले त्यांचे शॉर्ट्समधील फोटो हा सगळ्यांचाच चर्चेचा विषय ठरला होता. या फोटोंमध्ये ऐश्वर्या यांनी पांढऱ्या रंगाची शॉर्ट आणि केशरी रंगाचा स्वेटशर्ट घातला होता. त्यांचा हा विंटर लूक नेटकऱ्यांना तुफान भावला. ऐश्वर्या यांना सगळ्यांचा साडीमध्ये पाहायला फार आवडते. त्या साडीमध्ये अतिशय मोहक आणि सुंदर दिसतात. साडीमधले त्यांचे अनेक बोल्ड फोटो देखील बऱ्याचदा व्हायरल झाले आहेत.

दरम्यान ऐश्वर्या सध्या झी मराठीवरील मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मुख्य खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. १९९५मध्ये त्यांनी अभिनेते अविनाश नारकर यांच्याशी लग्न केले त्यांच्या लग्नाला २६ वर्ष झाले असून, त्यांना एक मुलगा देखील आहे. मात्र आजही त्या जोमानेच आणि हिरहिरीने काम करतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा