Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड मुलीसह ऐश्वर्या अन् अभिषेक पॅरिसला रवाना; आराध्याच्या उंचीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

मुलीसह ऐश्वर्या अन् अभिषेक पॅरिसला रवाना; आराध्याच्या उंचीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या वेळेनुसार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. तसेच आपले फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिचा पती तसेच अभिनेता अभिषेक बच्चन मुलगी आराध्यासोबत शनिवारी (२ ऑक्टोबर) पॅरिसला रवाना झाले आहेत.

कोरोना विषाणूची परिस्थिती लक्षात घेता तब्बल दोन वर्षानंतर आता त्यांनी फिरायला जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे जोडपे मुंबई विमानतळावर त्यांची मुलगी आराध्यासोबत दिसले. ऐश्वर्याची ही गेल्या दोन वर्षातील पहिली आंतरराष्ट्रीय ट्रीप आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, ऐश्वर्याने या वर्षांमध्ये स्वतःला देशात ठेवणे चांगले मानले. ऐश्वर्या आणि अभिषेकसह आराध्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत.

कोरोना विषाणूदरम्यान, जिथे बॉलिवूड सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्टीवर जात आहेत. त्याचवेळी ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी पॅरिसला जाण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्यासोबत अभिषेक आणि आराध्या यांनीही या काळात कॅज्युअल वेअर घातले होते. ऐश्वर्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. यादरम्यान तिने एक बॅग आणि शूज घालून तिचा लूक पूर्ण केला. त्याचवेळी, अभिषेक बच्चनने राखाडी स्वेटशर्ट असलेली सैल जॉगर पँट घातली होती. त्याच्या हातावर एक मलमपट्टीही दिसत होती. अलीकडेच अभिनेत्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती.

फोटोंमध्ये ऐश्वर्या रायने मुलगी आराध्याचा हात पकडलेला दिसत आहे. तसेच, दुसऱ्या हातात हँडबॅग घेतली आहे. यावरून सिद्ध होते की, ती किती काळजी करणारी आई आहे.

सोशल मीडियावर नेटकरी तिच्या या काळजी करण्याच्या अंदाजाची प्रशंसा करत आहेत. दुसरीकडे काही जणांचे लक्ष आराध्याच्या उंचीवर गेले. युजर्स म्हणाले की, जर इतक्या वेगाने आराध्याची उंची वाढत राहिली, तर ती लवकरच ऐश्वर्याच्या उंचीही क्रॉस करेल.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभाग घेण्यासाठी रवाना झाली आहे. तिथे ती लॉरियल ब्रँडचे प्रतिनिधित्व करेल.

अलीकडेच पुद्दुचेरीहून ऐश्वर्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. ती तिच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे गेली होती. अभिनेता आणि राजकारणी आर सारथकुमार देखील तिच्यासोबत चित्रपटात दिसणार आहेत. कल्की कृष्णमूर्ती यांच्या लोकप्रिय ऐतिहासिक कादंबरीवर आधारित हा चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा