बॉलिवूडमध्ये प्रत्येक शुक्रवार हा सिनेप्रेमींसाठी एक पर्वणी घेऊन येतो. प्रत्येक शुक्रवारी सिनेमे प्रदर्शित होतातच यातले काही फ्लॉप होतात, काही हिट होतात, काही सुपरहिट होतात आणि काही सुपरहिट होत प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडतात. रसिकांच्या कायम स्मरणात राहणारे फारच मोजके चित्रपट असतात, जे नेहमी लोकांना आठवतात. असाच एक सिनेमा म्हणजे ‘धूम २.’ ऋतिक रोशन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, बिपाशा बसू यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा २४ नोव्हेंबर २००६ रोजी प्रदर्शित झाला होता. आज या सिनेमाला प्रदर्शित होऊन १५ वर्ष पूर्ण झाले आहेत. १५ वर्षांनी देखील या चित्रपटाची जादू कायम आहे. टीव्हीवर जेव्हा जेव्हा हा सिनेमा लागतो तेव्हा तो मोठ्या आवडीने पाहिला जातो.
या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. सिनेमातील गाणी, ऍक्शन, स्टोरी आदी सर्वच गोष्टी प्रेक्षकांना खूपच आवडल्या. या सिनेमातील अजून एक गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत घेऊन गेली आणि ती म्हणे ऐश्वर्या राय आणि ऋतिक रोशन यांचा किसिंग सीन. या सिनेमात ऐश्वर्या आणि ऋतिकने एक किसिंग सीन दिला होता, जो काहींना आवडला तर काहींनी त्यावर खूप टीका देखील केली.
एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने या किसिंग सीनबद्दल सांगितले होते. ती म्हणाली की, “मी हा सीन करताना पडद्यावर जेवढी प्रामाणिक होती तेवढीच टेन्शनमध्ये मी पडद्यामागे होती. मी हा सीन दयायला अजिबात तयार नव्हते. मला वाटते प्रेक्षक देखील मला अशा सीनमध्ये पाहायला तयार नव्हते, मात्र तरीही मी हा सीन करायला तयार झाली. मला या सीनमुळे कायदेशीर धमक्यांना देखील सामोरे जावे लागले.”
सिनेमाच्या प्रदर्शनानंतर ऐश्वर्या आणि ऋतिकचा हा सीन खूपच व्हायरल झाला होता. मात्र धूम २ नंतर ऐश्वर्याने गुरु, प्रोवोक्ड, जोधा अकबर, सरकार राज, द पिंक पँथर 2, रावण, ऍक्शन रिप्ले, गुजारिश, जज्बा, सरबजीत, ऐ दिल है मुश्किल आदी अनेक सिनेमे केले पण तिने कोणत्याही सिनेमात किसिंग सीन दिला नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश
-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर
-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट










