Friday, November 22, 2024
Home कॅलेंडर सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी

सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी

ऐश्वर्या राय बच्चन ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर देशातच नाही, तर परदेशातही खूप नाव कमावले आहे. आजही जगाच्या कानाकोपऱ्यात तिचे चाहते आहेत. सोमवारी (1 नोव्हेंबर) अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

ऐश्वर्या रायचा जन्म आजच्या दिवशी, म्हणजेच 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला होता. पण, कुटुंब मुंबईत शिफ्ट झाल्यामुळे तीही इथे आली आणि इथूनच तिने शिक्षण पूर्ण केले. सौंदर्य आणि अभिनयासोबतच, बच्चन कुटुंबाची सून म्हणूनही ऐश्वर्याचे एक वेगळे स्थान आहे.

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्यानंतर, ऐश्वर्या राय ‘बच्चन’ बनली. आजही बऱ्याच चाहत्यांना माहिती नाही की, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची मने कशी जुळली आणि ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून कशी झाली. आज तिच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून बनण्यामागील कहाणी सांगणार आहोत…

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्या दिवसांमध्ये ऐश्वर्या आणि सलमान खानच्या प्रेमकथेची बरीच चर्चा असायची. पण, नंतर त्यांचे नाते तुटले. यानंतर ऐश्वर्याचे नाव विवेक ओबेरॉयसोबत जोडले जाऊ लागले आणि नंतर ऐश्वर्याने विवेकसोबतही ब्रेकअप केले.

दुसरीकडे, ऐश्वर्यापूर्वी अभिषेक बच्चनने कपूर घराण्याची मुलगी करिश्मा कपूरसोबत साखरपुडा केला होता. मात्र काही कारणांमुळे या दोघांचेही ब्रेकअप झाले. ‘ढाई अक्षर प्रेम के’ दरम्यान झालेल्या ऐश्वर्या अभिषेकच्या मैत्रीचा पुढचा टप्पा ‘उमराव जान’मधून पुढे सरकला. 2006 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली.

ऐश्वर्या राय बच्चनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, अभिषेक बच्चनने अगदी रोमँटिक पद्धतीने तिला प्रपोज केले होते. त्याने टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गुरु’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नकली अंगठी घालून ऐश्वर्याला प्रपोज केले होते. त्यानंतर 2007 साली हे जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. त्यानंतर ती बच्चन कुटुंबाची सून बनली आणि तिने अमिताभ बच्चन यांच्या आलिशान बंगल्यात पाऊल ठेवले. लग्नाच्या 4 वर्षानंतर ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला, जीची काळजी घेण्यात ती कोणतीही कसर सोडत नाही. आज ऐश्वर्या आणि अभिषेक प्रत्येक प्रसंगी त्यांची मुलगी आराध्याची काळजी घेताना दिसतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-
कानातून रक्तस्त्राव होतानाही ऐश्वर्याने गाण्यासाठी केलं शूट, एकापेक्षा एक ठुमके लावत जिंकली लाखो मनं
हॉटेलमध्ये केलेली ‘ती’ चूक इतकी महागात पडली की विश्वसुंदरी सोडून गेली, विवेक- ऐश्वर्याच्या ब्रेकअपचा गाजलेला किस्सा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा