Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड लॉरियल पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याने लावले चार चाँद, पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसली जणू स्वर्गसुंदरी

लॉरियल पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याने लावले चार चाँद, पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसली जणू स्वर्गसुंदरी

बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने रविवारी पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभाग घेत रॅम्प वॉक केला. तिच्या या रॅम्पवॉक वेळी ऐश्वर्याला पाहून उपस्थित उपस्थित सर्वच जणं तिच्याकडे आणि तिच्या सौंदर्याकडे आ वासरून पाहत होते. पांढऱ्या पोशाखात ती एका सुंदर देवदूतासारखी दिसत होती. ऐश्वर्या राय आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड ‘लॉरियल पॅरिस’ ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या ब्रँडला प्रमोट करण्यासाठीच ती पॅरिसमध्ये पोहचली. ऐश्वर्यासोबत, अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनीही या फॅशन शोमध्ये भाग घेतला होता, पण ऐश्वर्यासमोर सर्व कलाकार दुजे ठरले.

पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करणा-या ऐश्वर्याने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. यावर तिने न्यूड मेकअप आणि गुलाबी लिपस्टिक लावून तिचा लूक पूर्ण केला. तिचा हा लूक इतका लक्षवेधी होता की ती या शो ची मुख्य आकर्षण ठरली. रॅम्पवर चालताना ऐश्वर्याला सगळेच बघत होते. ऐश्वर्या ब्रिटीश स्टार हेलन मिरेनसोबत हातात हात घालून चालताना दिसली. गायिका आणि अभिनेत्री कॅमिला कॅबेलो, ऑस्ट्रेलियन स्टार कॅथरीन लँगफोर्ड, अभिनेत्री अजा नाओमी किंग, हॉलीवूड स्टार अंबर हर्ड आणि गेम ऑफ थ्रोन्स अभिनेता निकोलाज कॉस्टर-वाल्डाऊ यांनीही या फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती.

अलीकडेच ऐश्वर्या रायला मुंबई विमानतळावर अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत पहिले गेले होते. जवळपास दोन वर्षांनी हे तिघे एकत्र आंतरराष्ट्रीय टूरवर गेले. याशिवाय अभिषेकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आयफेल टॉवरचा फोटोही शेअर केला होता. कोरोनामुळे ऐश्वर्याने जवळजवळ सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणे टाळले.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास ऐश्वर्या लवकरच मणिरत्नमच्या ‘पोनियान सेल्वन’ चित्रपटात दिसणार आहे, तसेच ती अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामुन’ या चित्रपटातही काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा