Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड ‘काकू सारखी दिसते आता…’ ऐश्वर्या राय झाली ‘या’ कारणासाठी सोशल मीडियावर ट्रोल

‘काकू सारखी दिसते आता…’ ऐश्वर्या राय झाली ‘या’ कारणासाठी सोशल मीडियावर ट्रोल

सिनेसृष्टीमधे काम करणाऱ्या कलाकारांवर सर्वच लोकं भरभरून प्रेम करतात. आपल्या आवडत्या कलाकाराला नेहमीच पाठिंबा देतात. त्याचे सिनेमे बघतात. काहीतरी अगदी देवासारखीच कलाकारांची पूजा देखील करतात. मात्र जशा नाण्याला दोन बाजू असतात तसे कौतुक करणाऱ्या फॅन्ससोबतच निंदा करणारे लोकं देखील या जगात आहे. त्यामुळे कलाकरांना अनेकदा त्यांच्या कपड्यांवरून, बोलण्यावरून, लिहिल्यावरून, पोस्टवरून, दिसण्यावरून किंबहुना सर्वच गोष्टींवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल केले जाते. हे प्रमाण एवढे जास्त आहे की आता कलाकार सुद्धा ट्रोलिंगला त्यांच्या आयुष्याचा एक दुर्लक्षित भाग म्हणूनच जगत असतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर चालणाऱ्या ट्रोलिंगचा सामना अनेक मोठमोठ्या लोकांना करावा लागतो. अगदी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते रणबीर कपूर यांच्यापर्यंत सर्वच लहान मोठ्या कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. आता अशाच एका ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मिस युनिव्हर्स असलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या रायला. नुकताच दिग्दर्शक सुभाष घई यांचा वाढदिवस झाला. या निमित्ताने मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार पोहचले. यावेळी ऐश्वर्या देखील आली.ती नेहमी प्रमाणे कमालीची सुंदर दिसत होती, मात्र नेटकऱ्यांना तिची जुनी तीच तीच हेयर स्टाईल आवडली नाही आणि या शुल्लक कारणावरून त्यांनी ऐश्वर्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

ऐश्वर्या रायचा लूक पाहून एकाने लिहिले, ‘तोंडावर प्लास्टिक लावता का तुम्ही?’ दुसऱ्याने लिहिले, ‘हेयर स्टाईल बदलू शकत नाही तर कमीत कमी ड्रेसिंग स्टाईल तर बदल’, एकाने लिहिले, ‘आता स्टाईल बदलवण्याची वेळ आली आहे. हीच लूक काकू सारखा आहे.’ तत्पूर्वी ऐश्वर्याच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती काही महिन्यांपूर्वीच मणिरत्नम यांच्या ऐतिहासिक ड्रामा असलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटात दिसली होती. याशिवाय ती सिनेसृष्टीतील विविध कार्यक्रमांना ती हजेरी लावताना दिसत असते. नुकतीच तिला मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या अनंत अंबानीच्या साखरपुड्याच्या वेळी स्पॉट केले गेलं होते.

हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Oscar Nomintaions 2023: भारतामधील ‘नाटू नाटू’ गाण्याशिवाय ‘या’ डॉक्युमेंट्रीलाही जाहीर ऑस्कर नामांकन
‘मी अक्षरशः मला विसरते…’ म्हणत मधुराणी प्रभुलकरने शेअर केली तिला स्वतःचाच विसर पडणाऱ्या गोष्टीची पोस्ट

हे देखील वाचा