Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन होय. तिने नव्वदच्या दशकापासून बॉलिवूड चांगलंच गाजवलं आहे. विवाह झाल्यापासून ती चित्रपटांमध्ये फार कमी दिसते. ऐश्वर्याच्या चाहत्यांना तिच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी तिच्या कुटुंबीयांचे पेज पाहावे लागते. कारण ऐश्वर्या सोशल मीडियावर सध्या जास्त ऍक्टिव्ह नसते.

सध्या तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो तिची चुलत बहीण श्लोका शेट्टीच्या लग्नातील आहेत. खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ऐश्वर्याच्या चाहत्यांना आता पुन्हा तिचे सौंदर्य पाहायला मिळाले आहे. या फोटो आणि व्हिडिओमध्ये ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या व पती अभिषेक बच्चनबरोबर दिसत आहे.

आपल्या परिवारासह ऐश्वर्याने या लग्नामध्ये डान्स देखील केला आहे. यामध्ये तिने सिल्वर रंगाचा लेहंगा परिधान केलेला दिसत आहे, तर कधी लाल रंगाचा गाउन परिधान केलेला दिसत आहे. तसेच तिने लाल गडद रंगाची लिपस्टिक लावली असून ब्राऊन सीरिजचा आय मेकअप केलेला आहे. तिचे हे सौंदर्य व डान्स पाहून तिचे चाहते पुरते घायाळ झाले आहेत.

 

ऐश्वर्याच्या चित्रपटांबद्दल व कामाबद्दल बोलायचे झाले, तर ‘देवदास’मधील पारो आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. ती आता तमिळ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पोंन्नीयीन सेलवन’ या तमिळ चित्रपटातून ती लवकरच चाहत्यांची मने जिंकण्यास सज्ज होणार आहे. त्याचबरोबर अनुराग कश्यप यांच्या ‘गुलाब जामून’ या चित्रपटात देखील ती झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या ‘फन्ने खान’ या शेवटच्या चित्रपटानंतर चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या पहाटे अमिताभ बच्चन यांनी उलगडले सोशल मीडियाचे रहस्य; नेटकरी म्हणाले, ‘झोपा आता’

-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर

-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी

हे देखील वाचा