Monday, July 1, 2024

कान्स फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या तिच्या ड्रेसने लोकांना इंप्रेस करण्यात ठरली अपयशी, स्टायलिस्ट बदलण्याचा मिळाला सल्ला

कान्स फिल्म फेस्टिवलच्या माहोलमध्ये अनेक भारतीय कलाकार या फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर त्यांच्या स्टाईलचा, त्यांच्या सौंदर्याचा जलवा दाखवताना दिसत आहे. या फिल्म फेस्टिवलडमध्ये नेहमीच सेलिब्रिटींचे लूक आणि त्यांची स्टाईल सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो. नुकताच या रेड कार्पेटवर अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिचा जलवा दाखवला आहे. ऐश्वर्या मागील बऱ्याच वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावताना दिसते. तिचे कान्समधील लूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यावेळी ऐश्वर्या कोणता लूक कॅरी करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आतापर्यंत या फेस्टिव्हलमधून ऐश्वर्याचे दोन लूक समोर आले आहेत. ऐश्वर्याचे हे दोन्ही लूक पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केले आहे.

ऐश्वर्याच्या पहिल्या लुकबद्दल तिचे फॅन्स खूपच जास्त उत्सुक होते. सर्वानाच ऐश्वर्या नक्की काय घातले हे पाहण्याची खूपच घाई झाली होती. तिच्या या लुकबद्दल बोलायचे झाल्यास ऐश्वर्याला तिच्या पहिल्याच लूकवरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते आहे. तिच्या ना ड्रेसने नाही तिच्या मेकअपने नेटकऱ्यांना प्रभावित केले. ऐश्वर्याने तिच्या पहिल्या लूकमध्ये Valentino चा गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. तिने डबल कॉम्पेक्ट ड्रिल ब्लेजर आणि पँट घातली होती. त्यातल्या केवळ ब्लेझरची किंमत २ लाख ७३ हजार ५९५ इतकी होती तर पँटची किंमत १ लाख ३१ हजार ३०० इतकी होती. या संपूर्ण ड्रेसची किंमत जवळपास ४ लाख होती. यासोबतच तिने गुलाबी रंगाचे ड्रेसला मॅचिंग सँडल्स घातले होते.

ऐश्वर्याचा हा लूक फॅशन एक्स्पर्ट असलेल्या आस्था शर्मा यांनी डिझाइन केला होता. या ड्रेसवर तिने केसांचा मधून भंग पडत ते मोकळे ठेवले होते. यावर तिने अतिशय साधा मेकअप केला होता. मात्र याच मेकअपमुळे तिला ट्रोल केले गेले. ट्रॉलर्सला नाही तिचा महागडा ड्रेस आवडला आणि नाही तिचा मेकअप. तिच्या चेहऱ्यावर सूज दिसून येत होती आणि ती म्हातारी देखील दिसत होती.

ऐश्वर्याच्या दुसऱ्या मेकअपबद्दल सांगायचे झाल्यास ती या लूकने देखील लोकांना इंप्रेस करण्यात अपयशी ठरली आहे. या वेळी तिने Voluminous चा काळ्या रंगाचा गाऊन कॅरी केला होता. या गाऊनवर तिने सिंफनी 3D फ्लोरल मोटिफ्स जोडले होते. या ड्रेसवर तिने गुलाबी लिपस्टिक, बोल्ड आयमेकअप, मस्कारा आणि सेटल बेस ठेवत लूक पूर्ण केला. मात्र लोकांना तिचा हा लूक देखील आवडला नाही. या लूकवरून देखील तिला मेकअप आणि ड्रेससिंगवरून ट्रोल केले गेले. लोकांनी तिला तिचा स्टायलिस्ट बदलण्याचा देखील सल्ला दिला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा