Tuesday, July 9, 2024

चित्रपटापासून दूर असूनही तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालकीण आहे बच्चन घराण्याची सून, जाणून घ्या ऐश्वर्या रायचे नेटवर्थ

बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिने नुकताच सोमवारी (१ नोव्हेंबर) रोजी तिचा वाढदिवस साजरा केला आहे. अनेकांना तिच्याबाबत ही गोष्ट माहीत नसेल की, ती एकेकाळी बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणारी भारतीय महिला होती. २००९ च्या फोर्ब्सच्या माहितीनुसार, भारतीय यादीत सर्वात जास्त कमावणाऱ्या महिलांमध्ये ऐश्वर्या टॉपला होती. २०२० मध्ये या यादीत अक्षय कुमार टॉपला होता. आज भलेही ऐश्वर्या चित्रपटात जास्त काम करत नाही, परंतु कमाई करण्यात ती कुठेही कमी नाही. ती अगदी राणीप्रमाणे आयुष्य जगते.

ऐश्वर्या राय ही एकेकाळी बॉलिवूडमधील डिमांडेड अभिनेत्री होती. परंतु लग्नानंतर तिने चित्रपटात काम करणे कमी केले. परंतु दुसरीकडे जाहिराती आणि इतर काही मार्गातून तिची कमाई होत असते. (Aishwarya rai is owner of crores property, know her networth)

फोर्ब्सने २००९ साली हॉलिवूडमधील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या १,४११ कलाकारांच्या नावाची यादी जाहिर केली होती. त्यावेळी ऐश्वर्या ३८७ नंबरला होती आणि तेव्हा ती भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी महिला‌ होती.

माध्यमातील वृत्तानुसार, २०२० मध्ये ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती ३१ मिलियन अमेरिकन डॉलर होती. भारतीय नोटांमध्ये जवळपास २२७ कोटी एवढी आहे. तसेच अभिनय करिअर आणि मॉडेलिंग व्यतिरिक्त ऐश्वर्याची एकून कमाई २५८ कोटी एवढी आहे.

ऐश्वर्याचे मुंबईमधील बांद्रा येथे एक अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत जवळपास २१ कोटी एवढी आहे. दुबईमध्ये देखील तिचे एक आलिशान घर आहे. ज्याची किंमत १५.६ कोटी एवढी आहे. ऐश्वर्या बेंटले काँटिनेंटलची मालकीण आहे. जिची‌ किंम्मत ३.६५ कोटी एवढी आहे. तसेच तिच्याकडे २.३५ कोटीची मर्सिडिज बेंझ एस५०० आहे.

फोर्ब्सच्या यादीत २००९ साली आमिर खान ५४० क्रमांकावर होता. यानंतर शाहरुख खान ७३५, सलमान खान ७५३, इरफान खान ८२५ आणि ऋतिक रोशन १,०५९ क्रमांकावर होता. यात भारतीय महिलांमध्ये ऐश्वर्याचा क्रमांक अव्वल स्थानी होता. ऐश्वर्या ही भारतातील अनेक ग्रामीण भागांमध्ये मदत करते. तिने २००४ साली ऐश्वर्या राय फाऊंडेशनची स्थापना केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फोटोत दिसणाऱ्या ऐश्वर्याला ओळखलंत का? कट्टर फॅन असाल, तर घ्यावी लागणार नाही जास्त मेहनत

-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?

-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी

हे देखील वाचा