बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल म्हणून अभिषेक बच्चन ऐश्वर्या राय यांचे नाव घेतले जाते. लग्नाच्या अनेक वर्षांनी देखील त्यांच्यातील केमिस्ट्रीने नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक पॉवरफुल कपल म्हणून देखील त्यांचा एक वेगळाच रुतबा इंडस्ट्रीमध्ये आहे. त्याच्याबद्दल, त्यांच्यातील किस्स्यांबद्दल आपण नेहमीच काहींना काही ऐकत असतो. यातच आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या अभिषेकवर चिडलेली दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान गाजत असून, यावरून ऐश्वर्या ट्रोल देखील केले जात आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अभिषेक त्याची कबड्डी टीम असलेल्या जयपूर पिंक पँथर्सला त्यांच्या सामन्यासाठी चीयर करताना दिसत आहे. हा सामना पाहण्यासाठी ऐश्वर्या लेक आराध्यासह स्टेडियम उपस्थित होती. यावेळी अभिषेक ऐश्वर्याला काहीतरी सांगताना दिसतो, मात्र ऐश्वर्या त्याच्याकडे रागाने बघते. यानंतर ऐश्वर्या तिची भाची असणाऱ्या नव्या नवेली नंदाशी देखील विचित्र वागताना दिसली. या व्हिडिओमध्ये अभिषेकचे मित्र पूजा हेगडे आणि सिकंदर खेर देखील दिसत आहे.
Aishwarya rolls eyes at Abhishek then snaps at Navya ???? ????
by u/asamshah in BollyBlindsNGossip
सार्वजनिक ठिकाणी ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये दिसलेला राग हा काही आज पहिल्यांदा दिसतो असे नाही. याआधी देखील सुभाष घई यांच्या वाढदिवसाच्या पार्टीवेळी ऐश्वर्या अभिषेकवर चिडलेली दिसली होती. एकदा तर अभिषेक रागात ऐश्वर्याला पापराजींसमोर पोज देताना सोडून गेला होता. त्यांच्या अशा वागण्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल देखील केले गेले आहे.
दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ऐश्वर्या लवकरच ‘पोन्नियन सेल्वन 2’मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, तो खूपच गाजत आहे. तर अभिषेक आर बल्की यांच्या ‘घुमर’मध्ये दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन