बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांची मन जिंकली आहेत. तिने अनेक चित्रपट काम करून चाहत्यांच्या मनात एक स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री ऐश्वर्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे, पण आता एक मोठा ब्रेक घेऊन लवकरच मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियन सेलवन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती मणिरत्नमच्या ‘पोन्नियन सेलवन’ या चित्रपटावर काम करत आहे, ज्याचे चित्रीकरण मध्यप्रदेशातील ओरछा येथे सूरू आहे.
त्याचवेळी सेटवरून काही फोटो लीक झाले आहेत. ज्यात ऐश्वर्या खूप सुंदर दिसत आहे. तिने सुंदर अशी लाल आणि सोनेरी रंगाची सिल्क कांजीवरम साडी परिधान केलेली आहे. त्यावर शोभतील असे दागिनेही तिने घातले आहेत. अभिनेत्री ऐश्वर्याचा हा लूक चाहत्यांना प्रचंड वेड लावत आहे. या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता प्रकाश राज, त्रिश कृष्णन आधीच उपस्थित होते. याशिवाय जयम रवी, कार्ती, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलीपाला या चित्रपटात झळकणार आहेत. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री आपली मुलगी आराध्यासोबत दिसली.
या चित्रपटात ऐश्वर्या मंदाकिनी देवीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या ‘पोन्नियन सेलवन’ कादंबरीवर आधारित आहे. ज्याचा पहिला भाग २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच अभिनेत्रीने एक पोस्टर शेअर केले ज्यावर PS-1 लिहिलेले होते.
ऐश्वर्या राय बद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच तमिळ चित्रपट ‘पोन्नियन सेलवन’मध्ये दिसणार आहे. तसेच ती अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामुन’ मध्ये काम करताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऐश्वर्या शेवटची ‘फन्ने खान’ चित्रपटात दिसली होती. ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये ‘देवदास’, ‘रावण’ आणि ‘जोधा अकबर’ सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ
-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर
-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर