Sunday, July 14, 2024

घटस्फोटाआधीची ऐश्वर्याची पोस्ट होतीये व्हायरल, ३ महिन्यांपूर्वी धनुषबरोबर सर्व होते सुरळीत

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांतच्या घटस्फोटाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीला जोरदार धक्का बसला आहे. १८ वर्षाचा सुखी संसार मोडून वेगळ होण्याचा निर्णय त्यांनी का घेतला याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सगळ्या पाश्वभूमीवर आता धनुषची पत्नी ऐश्वर्याने तीन महिन्यांपूर्वी केलेल्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेमकी काय होती ती पोस्ट चला पाहूया.

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेता धनुष (Dhanush) आणि सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्याच्या (Aishwarya Rajinikanth) घटस्फोटाचीच चर्चा सुरू आहे. अभिनेता धनुषने सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत घटस्फोट घेत असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. या पोस्टमध्ये तो म्हणाला होता की, “१८ वर्षांचा सहवास, मैत्री, प्रेम, पालकत्व आणि एकमेकांचा आधार. सोबत प्रगती, समजूतदारपणा, आणि एकमेकांशी जुळवून घेणं आणि त्यातून निर्माण होणारा समंजसपणा, असं हे आमचं नातं होतं. आज आम्ही अशा जागेवर उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळे होऊन आम्ही स्वतःला शोध घेण्याचा प्रयत्न करू. कृपया आमच्या निर्णयाचा तुम्ही मान ठेवा आणि आम्हा दोघांनाही यातून बाहेर पडण्यासाठी थोडासा वेळ द्या.”

त्याचप्रमाणे ऐश्वर्यानेही सोशल मीडियावरून ही माहिती दिली, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. मात्र, धनुषची पत्नी ऐश्वर्याने या गोष्टीचे संकेत आधीच दिले होते, अशी बातमी आता समोर येऊ लागली आहे. तिची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवरील तिची ही व्हायरल पोस्ट ऑक्टोबर २०२१ मधील आहे. या पोस्टमध्ये तिने आपले वडील रजनीकांत आणि पती धनुषचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने “हे माझे आहेत आणि हा इतिहास आहे,” असे कॅप्शनही लिहिले आहे.

या फोटोवरून तिला हे नाते इतिहास होणार आहे, असे तरी सांगायचे नसेल ना, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही पाहा- १८ वर्षांचा संसार धनुष- ऐश्वर्याने एका ट्विटर पोस्टने संपवला

अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याची ओळख २००३ मध्ये एका चित्रपटावेळी झाली होती. धनुषचे काम पाहून ऐश्वर्या त्याच्यावर फिदा झाली होती. त्यानंतर त्यांच्यात हळूहळू मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. नोव्हेंबर २००४ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या दोघांनाही यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा