Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड भारीच! साेळा वर्षांपुर्वी अभिषेकबरोबर झालेल्या लग्नात ऐश्वर्या रायने घातली होती एवढ्या लाखांची साडी

भारीच! साेळा वर्षांपुर्वी अभिषेकबरोबर झालेल्या लग्नात ऐश्वर्या रायने घातली होती एवढ्या लाखांची साडी

बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्स अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय हे दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूपच खुश आहेत. याची माहिती ते वेळोवेळी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून देत असतात. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या सुखी संसाराला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. 20 एप्रिल 2007 मध्ये त्या दोघांचे लग्न झाले होते. अनेक कलाकार त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी लपवत असतात. पण ऐश्वर्या आणि अभिषेकचे नाते आधी पासूनच सगळ्यांच्या चर्चेत आहे. हे दोघेही स्टार असल्याने त्यांच्या बाबतीत कोणतीही माहिती लगेच व्हायरल होत असते.

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाआधी या दोघांचे वेगळ्या कलाकारांसोबत अफेयर होते . यावेळी ऐश्वर्याचे सलमान खान आणि विवेक ओबेरॉय सोबत अफेयर होते, तर अभिषेकचे नाव राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूर सोबत होते. अभिषेक आणि करिश्मा हे दोघे एकमेकांसोबत लग्न देखील करणार होते. त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता,पण काही कारणांमुळे तो तुटला.

अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, गुरु चित्रपटाच्या शूटिंगमध्ये न्यूयॉर्क मधील एका हॉटेलच्या बालकनीमध्ये त्याने ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली होती . या शूटिंग वरून मुंबईला आल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या घरी 14 जानेवारी 2017 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकचा साखरपुडा झाला आणि 20 एप्रिल 2007 ला ते दोघे विवाह बंधनात अडकले.

अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात झाले होते. तर रिसेप्शन ताज हॉटेलमध्ये झाले होते. तेव्हा माध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार, ऐश्वर्याने तिच्या लग्नात 75 लाखांची साडी घातली होती. ही साडी निता लुल्ला हिने डिझाईन केली होती. ते अभिषेक बच्चनने लग्नामध्ये अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेली शेरवानी घातली होती. अश्या प्रकारे अभिषेक आणि ऐश्वर्याचे धूमधडाक्यात लग्न झाले होते. लग्नाच्या 5 वर्षानंतर त्यांना एक गोड मुलगी झाली. त्यांचे नाव त्यांनी आराध्या असे ठेवले आहे. आराध्या आता 9 वर्षांची झाली आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘कुछ ना कहो’, ‘बंटी और बबली’, ‘उमराव जान’, ‘धूम 2’ आणि ‘गुरु’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. (aishwarya roy and abhishek bacchan celebrate their 16 th wedding anniversary)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खान का घालताे फाटलेले बूट? ‘या’ कलाकारांनी केला धक्कादायक खुलासा, वाचा संपुर्ण प्रकरण

देश साेडण्याच्या निर्णयावर प्रियांका चाेप्राला हाेतं दु:ख? म्हणाली, “घराच्या भिंती खायला…”

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा