बॉलिवूड कलाकारांची मुलं चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. काही कलाकारांची मुलं ही चित्रपटसृष्टीत अजून काम करत नाहीत, तरीही त्यांचा चाहतावर्ग लाखोंच्या घरात आहे. यापैकीच एक म्हणजे सुपरस्टार अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगण होय. न्यासा नेहमीच आपल्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. ती इतर कलाकारांच्या मुलांप्रमाणेच इंटरनेटवर आपल्या झक्कास अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. अशातच आता न्यासाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
डान्स करताना मैत्रिणीला मारली चापट
नुकतेच न्यासा देवगणचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत न्यासा ट्रेंडिंग दोजा कॅट गाणे ‘फ्रीक’वर आपले डान्स मूव्हज दाखवताना दिसत आहे. गाण्याला जशी सुरुवात होते, ती बीट्सवर थिरकू लागते आणि आपले किलर मूव्हजसोबत आपला सेक्सी अवतार दाखवते. या गाण्यावर डान्स करताना न्यासा इतकी डुंबून जाते की, तिचा हात चुकून मागे बसलेल्या तिच्या मैत्रिणीच्या तोंडावर लागते. यानंतर ते दोघेही आपला डान्स बाजूला ठेवून जोरजोरात हसू लागते. (Ajay Devgan Daughter Nysa Devgan Made Such A Big Mistake While Dancing Video Goes Viral)
https://www.instagram.com/p/CUlZJZxIl7_/?utm_source=ig_web_copy_link
स्टायलिश ड्रेसमध्ये दाखवला टशन
व्हिडिओमध्ये न्यासाने पांढऱ्या रंगाचा नूडल स्ट्रॅप बटण- डाऊन ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये तिचा ड्रेसिंग स्टाईल सेन्स पदार्पणापूर्वीच दाखवते की, ती कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाहीये.
या व्हिडिओवर नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “ही अगदी तिच्या आईसारखी आहे.” याव्यतिरिक्त आणखी एका युजरने लिहिले की, “पाहून व्हिडिओ बनव तिच्या डोळ्याला लागलं असतं तर…”
काय करतेय न्यासा?
न्यासा सध्या दक्षिण पूर्व आशियाच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत बोलायचं झालं, तर याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर