अजय देवगननं आपल्या ‘सन ऑफ सरदार 2’ (Son of Sardaar 2) या नव्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी दिलजीत दोसांझ आणि भाषेवर सुरू असलेल्या वादावर मत व्यक्त केलं.
अजय देवगनच्या ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटाचा ट्रेलर ११ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजयसोबत मृणाल ठाकूर आणि रवि किशन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलर लॉन्चच्या खास वेळी अजय देवगननं फक्त चित्रपटाच नाही, तर इतर काही वादावरही मीडियासमोर खुलून बोललं. जेव्हा मीडियाने अजय देवगनला दिलजीत दोसांझच्या ‘सरदार जी 3’ आणि त्या चित्रपटावर सुरू असलेल्या वादांबद्दल विचारलं, तेव्हा त्याचं मत काय आहे हेही विचारण्यात आलं. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला घेतल्यामुळे काही लोक नाराज आहेत. विशेषतः पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फडब्लूआईसीईने दिलजीतवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
हिंदी-मराठी भाषावादावर अजय देवगनचा संताप म्हणाला,‘आता माझी सटकली!’ मीडियाने जेव्हा त्याला दिलजीत दोसांझच्या ‘सरदार जी 3’ या चित्रपटाविषयी आणि त्या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला घेतल्यामुळे सुरू असलेल्या वादांबद्दल विचारलं, तेव्हा अजय म्हणाला,”मी असं ठाम सांगू शकत नाही की कोण बरोबर आहे आणि कोण चुकलंय”. पुढे तो म्हणाला,”प्रत्येकाची आपली एक वेगळी मतं असतात. या सगळ्या गोष्टी बसून शांतपणे बोलून सोडवता येतात. मी कोणावर बोट दाखवणार नाही, किंवा कोणाला दोषही देणार नाही”. त्याच्या या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली अजय वादात न पडता शांतपणे आणि समजूतदारपणे सगळं हाताळायच्या बाजूने आहे.
बीबीसीशी बोलताना दिलजीत म्हणाला की, “या चित्रपटाचं शूटिंग हल्ल्यापूर्वीच झालं होतं. मेकर्सनी ठरवलं की हा चित्रपट फक्त परदेशात प्रदर्शित करायचा, आणि मी त्यांच्याशी सहमत होतो. कारण या चित्रपटावर खूप पैसे खर्च झाले होते, म्हणून त्यांचा निर्णय मला योग्य वाटला”. सध्या महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. शाळांमध्ये हिंदी भाषा बंधनकारक केल्यावर अनेक लोकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केलेत.
अजय देवगनला जेव्हा यावर त्याचं मत विचारलं, तेव्हा तो थोडा ‘सिंघम’ मोडमध्ये गेला आणि म्हणाला,”आता माझी सटकली!”
त्याचं हे उत्तर ऐकून फॅन्स हसले आणि वातावरणही थोडं हलकं झालं. या संपूर्ण इव्हेंटमध्ये अजय देवगननं कोणावरही आरोप केला नाही. उलट त्यानं सांगितलं की, वाद बोलून, शांतपणे मिटवले गेले पाहिजेत. अजयचा हा शांत स्वभाव फॅन्सना खूप आवडला.
आता चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचं झालं, तर ‘सन ऑफ सरदार 2’ हा चित्रपटा २५ जुलै २०२५ रोजी सगळ्या सिनेमागृहामध्ये लागणार आहे. यावेळी अजयसोबत सोनाक्षी नाही, तर मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
तारक मेहताने पुन्हा एकदा तोडले सगळे विक्रम; टीआरपी यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर…