Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड तब्बल ७ कोटी रुपयांच्या गाडीत बसण्यापूर्वी ‘सिंघम’ अजय देवगणने फोटोग्राफरला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला…

तब्बल ७ कोटी रुपयांच्या गाडीत बसण्यापूर्वी ‘सिंघम’ अजय देवगणने फोटोग्राफरला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला…

सोशल मीडियावर नेहमीच कोणती ना कोणती गोष्ट झपाट्याने व्हायरल होत असते. आपली माहिती सगळ्यांपर्यंत कमी वेळात पोहोचवण्याचे सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. सध्या सोशल मीडियावर ‘सिंघम’ फेम सुपरस्टार अजय देवगणचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या तब्बल सात कोटी रुपये किमतीच्या रोल्स रॉयल्स या गाडीमध्ये बसताना दिसत आहे. सोबतच एका व्यक्तीला मोलाचा सल्ला देताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे.

अजय देवगण हा बॉलिवूडमधील अत्यंत व्यस्त आणि यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. बुधवारी (३१ मार्च) त्याला मुंबईतील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्पॉट केले गेले होते. जेव्हा तो तिथून जात होता, तेव्हा फोटोग्राफरला ‘मास्क लाव’ असा सल्ला त्याने दिला आणि त्यानंतर तो त्याच्या गाडीत बसतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अजय देवगणच्या आजूबाजूला अनेक व्यक्ती दिसत आहे. या गर्दीमध्ये देखील त्याने फोटोग्राफरला मास्क लावण्यास सांगितले.

अजय देवगणने 2019 मध्ये रोल्स रॉयल्स ही गाडी खरेदी केली आहे. त्यावेळी या गाडीची किंमत 7 कोटी एवढी होती. या व्यतिरिक्त अजय देवगणकडे अनेक गाड्या आहेत.

नुकताच अजय देवगणचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावरून असे म्हटले जात आहे की, अजय देवगणचे दिल्लीमध्ये भांडण झाले आहे. या गोष्टीचा खुलासा करत त्याने लिहिले आहे की, “माझ्या सारखा‌ दिसणाऱ्या कोणत्या तरी व्यक्तीचे दिल्लीमध्ये वाद चालू आहेत. पण मी कुठेही गेलेलो नाहीये. माझ्या विषयीच्या या बातम्या खोट्या आहेत.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूड अभिनेता संजय कपूरच्या मुलीने शेअर केला बेली डान्स व्हिडिओ, पाहा झक्कास ठुमके

-सुपरस्टार ऋतिकच्या एक्स वाईफचा वर्कआऊट व्हिडिओ पाहिला का? फिटनेस आयकॉन मलायकानेही केली कमेंट

-फिटनेस असावा तर असा! अभिनेत्री कॅटरिना कैफने शेअर केला अवघड वर्कआऊट व्हिडिओ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

हे देखील वाचा