तौत्के चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. मनोरंजन जगातही तौत्केने कहर केला आहे. वादळामुळे मुंबई आणि आसपासच्या चित्रपटांचे सेट उद्ध्वस्त झाले आहे. अलीकडेच सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाचा सेट तौत्के चक्रीवादळामुळे उडाला आहे. यापूर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ चा सेटही तौत्के चक्रीवादळापासून सुटू शकला नाही. असेच काहीसे अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘मैदान’च्या सेटवरही घडले आहे. अजय देवगणच्या आगामी ‘मैदान’ या चित्रपटाचा सेटही तौत्के चक्रीवादळामुळे नष्ट झाला आहे.
चित्रपट निर्मात्यांनी या सेटला वाचावण्याकरता खूप प्रयत्न केले, पण निसर्गापुढे सर्वच प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. तौत्के चक्रीवादळामुळे सेटवर कुणालाही दुखापत झाली नसली, तरी सेटचा संपूर्ण नाश झाल्याने बरेच नुकसान झाले आहे. आता सेट कोसळल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक मिळू शकेल.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी वादळाचा तडाखा बसला, तेव्हा सेटवर सुमारे ४० लोक उपस्थित होते. प्रत्येकाने एकत्रितपणे येऊन सेट वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु १६ एकरात पसरलेला हा सेट वाचवू शकले नाहीत. ही दुसरी वेळ आहे की, १६ एकर क्षेत्राच्या मैदानात असलेल्या सेटवर संकट आले आहे. सन २०२० मध्ये, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन, आणि त्यानंतर पावसामुळे सेटचे खूप नुकसान झाले आहे. ‘मैदान’ हा चित्रपट फुटबॉल खेळावर आधारित आहे. यामध्ये अजय देवगन फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. अजय देवगणशिवाय प्रियामणि, गजराज राव आणि रुद्रनिल घोष हेही या चित्रपटात दिसणार आहेत.
विशेष म्हणजे तौत्के चक्रीवादळामुळे आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. यानंतर या वादळाने सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाच्या सेटवरही धडक दिली आहे. आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीचा सेट थोडक्यात वाचला आहे, कारण गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी संजय लीला भन्साळी यांनी सेट कव्हर केला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान