बॉलिवूडमधील पोलीस अधिकाऱ्याचे पात्र निभावलेला लोकप्रिय सिंघम म्हणजेच अजय देवगन आता पुन्हा एका खाकी वर्दित दिसणार आहे . त्याच्या या पात्राचे नाव रूद्र असे असणार आहे. मंगळवारी त्याची मुलगी निसा हिच्या वाढदिवशी त्याने त्याच्या पहिल्या वेब सीरिजचा श्रीगणेशा केला आहे.
ब्रिटिश वेब सीरिज ‘लुथर’चा रिमेक करून हिंदी वेब सीरिज ‘रूद्र: द एज ऑफ डार्कनेस’ बनवली आहे. यामध्ये अजय देवगन तेच पात्र निभावणार आहे, जे सुप्रसिद्ध अभिनेता इदरिस एल्बा याने निभावले होते. अजय देवगनने त्याच्या या भूमिकेबद्दल बोलताना असे सांगितले आहे की, “मला नेहमीच वेगळ्या आणि नवीन कहाणी आणि चांगला लोकांसोबत काम करायला आवडते. यामागील माझा उदेश्य एवढाच आहे की, भारतातील मनोरंजनाचा दर्जा उंचावला पाहिजे. मी या सीरिज बाबत खूप उत्साहित आहे.”
अजय देवगनने याआधी देखील पडद्यावर अनेक वेळा पोलिसाची भूमिका निभावली आहे. मग ही भूमिका नक्की कश्या प्रकारे वेगळी आहे ?? या प्रश्नाचे उत्तर देताना अजयने सांगितले की, “हो मी या आधी अनेक वेळा पोलिसाचे पात्र निभावले आहे. पण या वेबसीरिजमध्ये माझे पात्र खूपच कॉम्लेक्स आणि डार्क असणार आहे. हे करण्यासाठी मी देखील खूप उत्साहित आहे.”
‘रूद्र: द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजची शूटिंग मुंबईमध्ये होणार आहे. यासाठी अजय देवगनचे नाव नक्की झाले आहे. अजय सोबत अनेक कलाकार यामध्ये काम करताना दिसणार आहेत. मुंबईची कोरोनाची परिस्थिती जेव्हा केव्हा ठीक होईल, तेव्हा या वेब सीरिजची शूटिंग तातडीने चालू करण्यात येणार आहे. अजय त्याच्या या पहिल्याच वेब सीरिजसाठी खूप उत्साहित आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना लगेच आता काम चालू करता येणार नाही. तरीही त्याचे सगळे चाहते त्याच्या या वेब सीरिजमधील त्याची वेगळी भूमिका पाहण्यास खूपच उत्सुक असणार यात शंका नाही.
हेही वाचा-
–धक्कादायक.! भोजपुरी चित्रपटसृष्टीला मोठा हादरा; प्रसिद्ध गीतकाराचे कोरोनाने निधन
–चतुरस्त्र नट हरपला! अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा
–या अभिनेत्रीने चित्रपटात दिले होते सर्वाधिक रेप सीन; वयाच्या २७ व्या वर्षीच झाला होता जीवघेणा आजार










