अजय देवगणचा भाऊ, चित्रपट निर्माता अनिल देवगण याचे सोमवारी रात्री निधन झाले असल्याची माहिती अजयने मंगळवारी आपल्या ट्विटर द्व्यारे दिली.
२००२ मध्ये आलेल्या राजू चाचा आणि २००५ मध्ये आलेल्या ब्लॅकमेल या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल देवगणने केले होते. या दोन्ही चित्रपटात अजय मुख्य भूमिकेत दिसला होता. अनिल देवगनच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आपल्या भावाच्या अश्या अचानक जाण्याचा शोक व्यक्त करत अजय देवगणने त्याचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की “काल रात्री मी माझा भाऊ अनिल देवगणला गमावले. त्याच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबाचे मन दुखावले गेले आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी प्रार्थना करा. सध्या चालू असलेल्या कोरोनव्हायरस साथीच्या आजारामुळे आमच्या कुटूंबाची शोक सभा एकत्र होणार नाही. असे ट्वीट करून त्याने आपले दुःख चाहत्यांसमोर मांडले.
अनिल देवगणने अजय मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटांवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. जान, इतिहास, प्यार तो होना ही था आणि सोन ऑफ सरदार हे त्यातलेच काही सिनेमे.
अनिल आणि अजय देवगण यांचे वडील अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगन यांचे गेल्या वर्षी मेमध्ये निधन झाले. अजय आणि त्याच्या वडिलांनी इश्क, जान, हकीकत, दिलवाले, दिव्य शक्ती, जिगर आणि फूल और कांटे या चित्रपटात एकत्र काम केले. वीरू देवगण यांनी क्रांती, सौरभ आणि सिंघासन यासारख्या काही चित्रपटांत अभिनय देखील केला आहे हे अनेक जणांना ठाऊक नाही.