Thursday, June 19, 2025
Home बॉलीवूड १३ वर्षांनी प्रदर्शित होतोय सन ऑफ सरदारचा सिक्वेल; अजय देवगणने शेयर केले पहिले पोस्टर…

१३ वर्षांनी प्रदर्शित होतोय सन ऑफ सरदारचा सिक्वेल; अजय देवगणने शेयर केले पहिले पोस्टर…  

अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘सन ऑफ सरदार २‘ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये अजय देवगण पगडी घातलेल्या सरदाराच्या लूकमध्ये दिसत आहे. तो दोन टँकरवर उभा आहे. चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाचा सिक्वेल आहे.

‘सन ऑफ सरदार २’ च्या नवीन पोस्टरमध्ये अजय देवगण पिवळ्या पगडी घालून अ‍ॅक्शनमध्ये उभा असल्याचे दिसून येते. त्याने पॅन्ट, टी-शर्ट, साद्री घातली आहे. त्याने वर काळे जॅकेट घातले आहे. अजय देवगण दोन टँकरवर उभा आहे. पोस्टरवर ‘सन ऑफ सरदार २’ लिहिले आहे. त्याची टॅग लाईन ‘द रिटर्न ऑफ सरदार’ (सरदार की वापसी) आहे. पोस्टरमध्ये त्याची रिलीज डेट देखील लिहिलेली आहे.

‘सन ऑफ सरदार २’ मध्ये अजय देवगण व्यतिरिक्त मृणाल ठाकूर आणि संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकांमध्ये असतील. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा जस्सीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण करत आहेत. नवीन पोस्टरनुसार, ‘सन ऑफ सरदार २’ २५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्त होते. चित्रपटात दाखवण्यात आले होते की अजय देवगण सोनाक्षीच्या प्रेमात पडतो पण सोनाक्षीचा भाऊ संजय दत्त या नात्याला विरोध करतो. चित्रपटाची कथा याचभोवती फिरते. चित्रपटाचे बजेट ३० कोटी रुपये होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६१.४८ कोटी रुपये कमावले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

‘सितारे जमीन पर’ रिलीझ पूर्वीच प्रेक्षकांचा प्रतिसाद, रिलीजपूर्वी केली कोटींची कमाई

हे देखील वाचा