Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड शाहरुख खानसोबतच्या वादावर अजय देवगणने दिली पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

शाहरुख खानसोबतच्या वादावर अजय देवगणने दिली पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgn) आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. प्रत्येक वेळी अजय त्याचा वेगळा अवतार चाहत्यांना दाखवत असतो ज्यामुळे त्याचे चाहते नेहमीच त्याचे कौतुक करताना दिसतात. अजयने ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. अजयच्या पदार्पणानंतरच शाहरुख खानने (Shahrukh Khan) इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. शाहरुखचा ‘दीवाना’ हा चित्रपट 1992 मध्ये रिलीज झाला होता. अजय आणि शाहरुख दोघेही दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत आहेत. मात्र, दोघांचा प्रवास वाद त्यांच्यातील वादामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. अलीकडेच अजय देवगणला त्याच्या आणि शाहरुख खानमधील शीतयुद्धाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

अजय देवगण, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार आणि आमिर खान या तिघांनी एकाच वेळी इंडस्ट्रीत प्रवेश केला. आता अजयने मुलाखतीत शाहरुख खानसोबतच्या वादाबद्दल स्पष्टिकरण दिले आहे.एका मुलाखतीत अजय देवगण म्हणाला की, “90 च्या दशकात, आमच्यापैकी 6-7 जणांनी कारकीर्द एकत्र सुरू केली किंवा एक किंवा दोन वर्षांच्या अंतराने इंडस्ट्रीत आलो. आम्ही सर्व एक चांगला मित्र म्हणून काम करतो. आम्ही सर्व एकमेकांना सपोर्ट करतो. मीडिया माझ्या आणि शाहरुखबद्दल काहीही लिहू शकतो, पण तसं काहीही नाही या सगळ्या अफवा आहेत.”

अजय देवगण पुढे म्हणाला की “आम्ही फोनवर बोलतो आणि आमच्यात सर्व ठीक आहे. एकाला अडचणीत आल्यावर दुसरा त्याच्या पाठीशी उभा राहतो. आमचा एकमेकांवर विश्वास आहे. आमच्यात कधीच काही अडचण आली नाही.” अजय देवगणने त्याच्या आणि शाहरुख खानच्या भांडणाच्या अफवेला जबाबदार असलेल्या चाहत्यांना सांगितले की, “जे सोशल मीडियावर कोणता अभिनेता चांगला आहे यावर भांडत राहतात.. जेव्हा ते लोक भांडू लागतात तेव्हा लोकांना वाटते की दोन कलाकारांमध्ये भांडण आहे. मग आम्ही एकत्रितपणे यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो परंतु मी सर्व चाहत्यांना सांगू इच्छितो की आम्ही सर्व एक आहोत. पुढच्या वेळी आमच्यासाठी भांडू नका.” दरम्यान अजय देवगण आणि शाहरुख खान सध्या सिने जगतातील सर्वात यशस्वी अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा