Saturday, July 6, 2024

काय सांगता! फक्त नॉनव्हेज जेवणामुळे बंद पडला संजय दत्त आणि अजय देवगण यांचा एक चित्रपट

बॉलिवूडमध्ये अजय देवगण आणि संजय दत्त यांच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. गेली अनेक वर्ष संजय दत्त आणि अजय देवगण यांची मैत्री टिकून आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. याशिवाय दोघांनाही तुफान फॅन फॉलोविंग आहे. आपापल्या ठिकाणी यशाचा शिखरावर असलेल्या या दोघं सुपरस्टार कलाकारांना घेऊन एखादा चित्रपट बनवावा अशी इच्छा आजच्या काळात प्रत्येकाची आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का हे दोघे सुपरस्टार ‘बीहड़’ या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार होते. बॉलिवूडमधील अतिशय दिग्गज दिग्दर्शक असलेल्या मिलन लुथरिया यांचा हा सिनेमा असल्याने सिनेमाची तुफान चर्चा होती, मात्र अचानक हा सिनेमा बंद पडला तो आजतागायत बंदच आहे. चला तर जाणून घेऊया हा सिनेमा बंद होण्याचे कारण.

मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘बीहड़’ या सिनेमात अजय देवगण आणि संजय दत्त एकमेकांच्या विरोधात उभे पाहायला मिळणार होते. एक पोलीस तर दुसरा डाकूंच्या भूमिकेत दिसणार होता. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाची निर्मिती कुमार गौरव. बंटी वालिया आणि बबलू पचीसिया हे तिघं करणार होते. सिनेमाची सर्व तयारी झाली होती, मात्र निर्माते बबलू पचीसिया यांच्या रागामुळे हा सिनेमा बंद झाला.

मीडियामधील रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचे निर्माते असलेले बबलू पचीसिया अतिशय रागीट स्वभावाचे होते. ते शाकाहारी जेवण जेवायचे. मांसाहाराबद्दल त्यांना खूपच चीड होती. मांसाहार तर सोडा ते सध्या या संदर्भातला मजाक देखील सहन नव्हते करत. त्यांच्या ऑफीमध्ये देखील स्टाफला नॉनव्हेज आणण्यासाठी मनाई होती. मात्र एक दिवस मिलन लुथरिया यांच्याकडून या नियमाचा भंग झाला. मग काय बबलू पचीसिया खूपच चिडले.

एका माहितीनुसार मिलन लुथरिया हे याच चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनच्या कामासाठी बबलू पचीसिया यांच्या ऑफिसमध्ये पोहचले होते. यादरम्यान त्यांनी मांसाहारी जेवण मागवले आणि आल्यावर तिथेच जेवण करण्यास सुरुवात केली. जेव्हा बबलू पचीसिया यांनी हे पहिले तेव्हा ते खूपच चिडले आणि आपल्या पूर्ण टीमसमोर ते मिलन यांच्यावर खूपच ओरडले. यावरून त्या दोघांचे नाते खराब झाले. या छोट्या कारणामुळे ‘बीहड़’ हा सिनेमा बंद पडला. मात्र याबद्दल कोणीही मीडियासमोर काहीच बोलले नाही.

अजय देवगण आणि मिलन लुथरिया यांचे नाते खूपच चांगले आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘कच्चे धागे’, ‘चोरी चोरी’, ‘बादशाहो’ आदी चित्रपटांचा समावेश होतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा