Sunday, June 8, 2025
Home साऊथ सिनेमा ‘तो’ व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अजय देवगणची अभिनेत्री झाली ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘असा व्हिडिओ टाकणं…’

‘तो’ व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अजय देवगणची अभिनेत्री झाली ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘असा व्हिडिओ टाकणं…’

प्रणिता सुभाष (Pranitha Subhash) हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री अभिनयासोबतच तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठीही खूप चर्चेत असते. अशातच सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यावरून सोशल मीडिया युजर्स तिला ट्रोल करत आहेत. हा व्हिडिओ प्रणिताने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, अभिनेत्री फेसाळ पाण्यात बसून पोझ देताना दिसत आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये ‘गहराइयां’ चित्रपटाचे टायटल ट्रॅक देखील वाजत आहे. या रीलमधील तिचा अंदाज काही चाहत्यांना आवडला, तर काहीजण तिला यावरून ट्रोलही करत आहेत.

बाथटबचा व्हिडिओ टाकल्यामुळे उडवली गेली अभिनेत्रीची थट्टा
‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ फेम अभिनेत्रीची या व्हिडिओमुळे खिल्ली उडवली जात आहे. या व्हिडिओवर एका युजरने लिहिले की, “आम्ही लहानपणी अशा प्रकारे आंघोळ करायचो आणि आता तू आता…” तर एकाने लिहिले, “ही पोस्ट टाकणे आवश्यक होते का?” तर काहींनी त्याच्यावर टोमणे मारत लिहिले, “तुला मदतीची गरज आहे का?” मात्र, अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुकही केले. (ajay devgn costar pranitha subhash gets trolled for sharing her bathtub video)

अभिनेत्री प्रणिता सुभाष ही एक दयाळू व्यक्ती आहे, जी सामाजिक कार्यातही सहभाग घेत असते. तेलुगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलेली प्रणिता अखेरची तेलुगू पडद्यावर ‘एनटीआर कथानायकुडू’मध्ये दिसली होती. तिने कन्नड चित्रपट ‘पोरकी’ आणि ‘एम पिल्लो एम पिल्लाडो’ या चित्रपटाद्वारे कन्नडमध्ये पदार्पण करून तिच्या अभिनयाची सुरुवात केली, तर ‘उदयन’ चित्रपटातून तमिळ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. सध्या ती ‘रमण अवतार’ या कन्नड चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

‘हंगामा २’मध्येही केलंय काम
प्रणिताने ‘हंगामा २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ज्यामध्ये शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra), परेश रावल (Paresh Rawal) आणि मीझान (Meezan) यांच्या मुख्य भूमिका आहेत. तिने अजय देवगणसोबत (Ajay Devgan) बॉलिवूडमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणूनही काम केले आहे. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर ५ दशलक्षाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.

शिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने ३० मे २०२१ रोजी, एका खासगी कार्यक्रमात बंगळुरूस्थित उद्योगपती नितीन राजू याच्याशी लग्न केले.

हेही वाचा :

हे देखील वाचा