Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अजय देवगणने केली आगामी ‘भोला’ चित्रपटाची घोषणा, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपट जगतात लोकप्रिय ठरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अजय देवगणचे (Ajay Devgn)  नाव पहिल्यांदा घेतले जाते. बॉलिवूडचा ‘सिंघम’ अशी ओळख असलेला अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयासाठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे. अनेक आव्हानात्मक भूमिका अजय देवगणने केल्या आहेत. सध्या अजय देवगण त्याच्या ‘रनवे ३४’ चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. अजय देवगणचा हा बहुचर्चित चित्रपट २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच अजयने त्याच्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना या नवीन चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 

बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण लवकरच ‘रनवे 34’ मध्ये दिसणार आहे, मात्र चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याने त्याच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. अजयच्या नवीन चित्रपटाचे नाव ‘भोला’ आहे. हा तमिळ भाषेतील ‘कैथी’ चित्रपटाचा रिमेक असेल. या चित्रपटाच्या नावासोबतच अजयने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. अजयचा हा चित्रपट पुढील वर्षी 30 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बूची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यापूर्वी ‘दोघे दे दे प्यार दे’ या चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले होते. अजयचा हा आगामी चित्रपट एक्शनने भरलेला असणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात तब्बूची व्यक्तिरेखा पोलीस अधिकाऱ्याची असेल. या चित्रपटात तब्बू जबरदस्त एक्शन करताना दिसणार आहे. धर्मेंद्र शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.  धर्मेंद्र शर्मा अजय देवगणचा चुलत भाऊ आहे. याआधी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटातून तो दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. दरम्यान अजयचा आगामी चित्रपट ‘रनवे 34’ 29 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. चित्रपटात अजय व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंग देखील दिसणार आहेत. अजय देवगणने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ हा मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉट स्टारवर प्रदर्शित झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा