Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड मेजर साब सिनेमाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी मारली होती तीस फुटांवरून उडी अजय देवगणने केला खुलासा

मेजर साब सिनेमाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी मारली होती तीस फुटांवरून उडी अजय देवगणने केला खुलासा

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन हे नुकतेच त्यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. त्यांना बऱ्यापैकी लागले असल्याने त्यांनी हैद्राबादमध्ये होणारी शूटिंग रद्द केली आणि ते मुंबईत त्यांच्या घरी परतले असून, सध्या ते आराम घेत आहे. दरम्यान नुकताच अजय देवगण आणि तब्बू यांच्या बहुप्रतीक्षित अशा ‘भोला’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी सर्वांनीच मेजर साब सिनेमाच्या सेटवर अमिताभ बच्चन जखमी झाले होते ती आठवण काढली. यावेळी मीडियाने अजय देवगणला त चित्रपटाच्या शुटिंगवेळी कोणती खबरदारी घेतो हे विचारले? त्यावर अजय म्हणाला, “पूर्वीपेक्षा आज ऍक्शन करणे जास्त सोपे झाले आहे, कारण आधीपेक्षा आता जास्त विविध गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत.”

ajay devgn

यावेळी अजय देवगणने मेजर साब सिनेमातील एका घटनेला यावेळी उजाळा दिला. तो म्हणाला, “तेव्हा बच्चनजी स्वतः ऍक्शन करायचे. त्याकाळी शुटिंगवेळी सुरक्षेसाठी फारशा उपाययोजना नव्हत्या. तेव्हा आम्हा सर्व कलाकारांना अनेकदा दुखापत व्हायची. अमिताभ बच्चन यांनी असे भरपूर सीन्स केले ज्याचा आपण विचारही करू शकत नव्हतो. आम्ही एकत्र मेजर साब सिनेमा करत होतो, ‘मेजर साब’ चित्रपटातील एका सीनमध्ये मला आणि बच्चनजी यांना एकत्र जवळपास ३० फुटांवरुन खाली उडी मारायची होती. मी अमिताभ बच्चन यांना हा सीन त्यांनी स्टंटमॅन कडून करून घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी याला सपशेल नकार दिला. पुढे आम्ही दोघांनी तो सीन एकत्र केला, तेव्हासुद्धा आम्हाला दुखापत झाली होती.”

तत्पूर्वी आता अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असून ते त्यांच्या घरी आराम करत आहे. हैद्राबादमध्ये प्रोजेक्ट के सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांना ऍक्शन करताना दुखापत झाली. याची माहिती त्यांनी स्वतः एका ब्लॉगमधून दिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गज पाकिस्तानी कलाकार कवी खान यांचे कॅन्सरमुळे दुःखद निधन

उफ्फ! रुबीना दिलैकचा ग्लॅमरस अंदाज, पाहणऱ्याचीही उडेल झाेप

हे देखील वाचा