Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘रुद्रा’ वेब सीरिजमधील डॉक्टर आलिया वैयक्तिक आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, साऊथमध्ये देखील केलंय काम

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनची ‘रुद्रा’ ही वेबसीरीज ४ मार्चला डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या सीरीजमध्ये ईशा देओलने बऱ्याच काळानंतर अभिनयात काम केले आहे. तिच्यासोबत राशी खन्नानेही ओटीटीवर पदापर्ण केले आहे. राशी वेबसीरीजमध्ये डॉक्टर आलिया चोकसीच्या पात्रात दिसत आहे. ती दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने खूप चित्रपटात काम केले आहे. तिने बॉलिवूडमध्ये जॉन अब्राहमसोबत पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने दक्षिणात्य सिनेमाकडे वाटचाल केली होती.

ती मूळची दिल्लीची आहे. तिचे बाबा राज कुमार खन्ना दिल्ली मेट्रोमध्ये काम करतात आणि तिची आई सरिता खन्ना या एक गृहणी आहे. तिचे शिक्षणही दिल्लीतल्या श्रीराम कॉलेजमध्ये झाले आहे, तिने ऑनर्स केले आहे. त्यानंतर ती मुंबईला आली.

तिने दक्षिणात्य सुपरहिट सिनेमात काम केले आहे. तिच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होत असते. आता ती बॉलिवूडमध्ये परत झळकणार आहे. ‘मद्रास कॅफे’ चित्रपटात आता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘योद्धा’ चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात दिशा पाटणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम गायिका आहे. तिने काही तेलुगू चित्रपटातही गाणी गायली आहेत .ती  सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.ती दररोज तिचे गॅ्लमरस फोटो शेअर करते. आणि तिचे फोटोही खूप व्हायरल होत असतात.

हे देखील वाचा