सध्या मराठी चित्रपट जगतात अनेक नवनवीन विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळेच मराठी सिनेसृष्टीची सध्या सर्वत्रच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसादही पाहायला मिळत आहे. या नाविण्यपूर्ण विषयांवरील कथा आणि चित्रपट प्रेक्षकांनाही प्रचंड आवडत आहेत. आता प्रेक्षकांना आणखी एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटाचा थरार अनुभवायला मिळणार आहे. ‘एक होतं माळीण’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नाव वाचून तुमच्या डोळ्यासमोर ती थरकाप उडवणारी घटना आलीच असेल याच कथेवर आता चित्रपट येणार आहे. ज्याचा पोस्टर नुकताच समोर आला आहे.
तीस जूलै २०१० ला संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना समोर आली होती. ही घटना होती जून्नर तालुक्यातील माळीण गावची. अचानक दरड कोसळल्याने हे संपूर्ण गावच गाडले गेले होते. या भयानक दुर्घटनेत ४४ घरे गाडली गेली होती ज्यामधील १५१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली होती. प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवणारी, मन सून्न करणारी अशी ही घटना होती. या घटनेच्या बातम्या पाहताना, वाचताना प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. आता याच ह्रदयस्पर्शी विषयावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एक होतं माळीण या नावाने हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. माळीणमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून माहिती घेऊन नव्यानं कथानक लिहिलं गेलं आहे. मोठ्या मेहनतीनं हा चित्रपट साकारला असून आता २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. ड्रीम डॉट क्रिएशनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण अरुण कोंजे हे सहनिर्माते आहेत.प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, दीपज्योती नाईक अशा उत्तम कलावंतांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. व्हीएफएक्स दिवाकर घोडके यांचे असून महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-