Wednesday, July 3, 2024

आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मिळाली गायक समर सिंगची ट्रांजिट रिमांड, होणार मोठा खुलासा?

भोजपुरी अभिनेत्री आकांशा दुबे आत्महत्या प्रकरणात वाराणसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या केसमधील मुख्य आरोपी असलेल्या गायक आणि निर्माता समर सिंगला गाजियाबादमधून अटक केली आहे. आरोपीला कोर्टात देखील सादर केले गेले आणि त्यानंतर वाराणसी पोलिसांना समर सिंगची ट्रांजिट रिमांड देखील मिळाली आहे. 

काही दिवसांपूर्वीच भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे वाराणसीमधील सारनाथ हॉटेलच्या एका रूममध्ये मृतावस्थेत आढळली होती. त्यांनतर पोलिसांनी समर सिंग आणि अजून एका व्यक्तीच्या नावाने लूक आऊट नोटीस काढली होती. समर सिंगला दिल्ली बॉर्डरवरील गाजियाबादमधील नंदीग्राम भागात असणाऱ्या चार्म क्रिस्टल या रहिवाशी इमारतीमध्ये लपलेला असताना ताब्यात घेण्यात आले. लोकल पोलीस आणि वाराणसी पोलीस यांनी एकत्र शोध घेतल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपीला वाराणसी पोलीस टीमने ट्रांजिट रिमांडसाठी गाजियाबादमधील कोर्टात सादर केले होते. जिथे वाराणसी पोलिसांना कोर्टाने आरोपी समर सिंगची २४ तासांसाठी ट्रांजिट रिमांड दिली आहे. आता समर सिंगला वाराणसी कोर्टात सादर केले जाणार आहे. त्यानंतर मोठा काही खुलासा होऊ शकतो.

भोजपुरी अभिनेत्री आकांशा दुबे वाराणसीमध्ये शूटिंगच्या निमित्ताने गेली असताना तेथील एका हॉटेलमध्ये ती २६ मार्च रोजी गळफास घेतलेली अवस्थेत आढळली होती. तर आकांक्षाच्या आईने समर सिंग आणि त्याचा भाऊ असलेल्या संजय सिंगवर ब्लॅकमेल आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावला होता. तेव्हापासूनच पोलीस त्यांचा शोध घेत होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका

Jackie Chan Birthday: जॅकी चॅनचे बॉलिवूडशी खास नाते, ‘या’ चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांसोबत केले आहे काम

हे देखील वाचा