Friday, November 22, 2024
Home अन्य Bigg Boss 15: प्रतीकसोबतच्या मैत्रीवर अकासाच्या पालकांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘तो खोटा…

Bigg Boss 15: प्रतीकसोबतच्या मैत्रीवर अकासाच्या पालकांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘तो खोटा…

प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. मारामारीपासून रोमान्स आणि मैत्रीपर्यंत, हा शो ड्रामा आणि मनोरंजनांनी परिपूर्ण ठरत आहे. असे अनेक स्पर्धक आहेत, जे अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. त्यापैकी अकासा सिंग आणि प्रतीक सेहजपाल हे दोन सर्वात लोकप्रिय स्पर्धक आहेत. ते त्यांचा खेळ चांगला खेळत आहेत आणि सोबतच त्यांचे एकमेकांशी असलेले बॉन्डही दिवसेंदिवस घट्ट होत आहे.

अकासा सिंगच्या पालकांनी अलीकडेच तिच्या आणि प्रतीक सेहजपाल यांच्यातील मैत्रीवर मत व्यक्त केलं आणि त्यांच्या मैत्रीला रिअल म्हटले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना, अकासाची आई म्हणाली, “जरी प्रतीक सेहजपाल खेळात नसता, तरी अकासा स्वतःचा खेळ खेळली असती. ती अशा लोकांपैकी नाही, जे खेळात पुढे जाण्यासाठी एखाद्याचा वापर करतात.” (akasa singh parents comment her friendship with pratik sehajpal in bigg boss house)

त्या पुढे म्हणाल्या, “मला समजतंय की, इतर सर्वांनीही अकासाशी मैत्री केली आहे. परंतु मला प्रतीकबद्दल जे वाटलं ते म्हणजे, तो त्याच्या मित्रांना आणि मैत्रीला महत्त्व देतो. तो खरा माणूस आहे. मला प्रतीक आणि अकासा दोन्ही खूप गोड वाटतात. ते चांगल्या मैत्रीत आहेत. तो खोटा नाही आणि त्यांची मैत्री खरी आहे.”

अकासा सिंगचे वडील पुढे म्हणाले की, “त्यांचं बॉन्ड ईशान आणि मायशासारखं नाही. अकासाला तिच्या मर्यादा माहीत आहेत आणि त्यांची मैत्री शुद्ध आणि खरी आहे. त्यांची मैत्री आणि बंध इशान आणि मायशा सारखे नाहीत. अकासा लहान नाही आणि तिला कोणाशी मैत्री करायची किंवा पसंत करायची हे ठरवणारे आम्ही नाही. ती स्वतःचा निर्णय घेऊ शकते. आम्ही तिचे पालक आहोत, पण निर्णय घेणे तिच्या हातात आहे. जर ती कोणाला पसंत करते आणि मैत्री करू इच्छित असेल, तर ती तिची निवड आहे. अकासा खूप छान मुलगी आहे. तिने कधीही आमचा अपमान होऊ दिला नाही किंवा आम्हाला लाज वाटावी असे काही केले नाही. हीच तिची सर्वोत्तम गुणवत्ता आहे.”

अशामध्ये आता अकासा आणि प्रतीकची मैत्री अशीच राहील, का वेळेनुसार तीही बदलेल, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न करतोय’, तेजस्वी प्रकाश अन् विशाल कोटियानच्या मैत्रीत दुरावा

-Bigg Boss 15: शोची प्राईझ मनी लागली पणाला, ‘विश्वसुंदरी’ने सदस्यांसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

-खुशखबर! चित्रपटगृहे उघडल्यानंतर मल्टिप्लेक्सकडून मोठी भेट; प्रेक्षक मोफत घेणार चित्रपट पाहण्याचा आनंद

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा