Wednesday, October 23, 2024
Home मराठी आकाश ठोसरचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले “आर्चीचा ट्रॅक्टर चोरला”

आकाश ठोसरचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले “आर्चीचा ट्रॅक्टर चोरला”

‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय आभिनेता आकाश ठोसर सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. आकाशने आपल्या अभिनयाची जादू दाखवून प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. विविध भुमिका साकारत आकाशने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आकाश सोशल मीडियावर सक्रीय असतो.

‘सैराट’ चित्रपटातून प्रसिध्दी मिळाल्यापासुन आकाशला एकावर एक चित्रपट मिळू लागले. तो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या आकाश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आकाशचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तो व्हिडिओ पाहून नेटकरी चकीत झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

आकाशने त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या आकाश सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याने कामातून ब्रेक घेतला आहे. तो त्याच्या गावी शेताच्या कामात रमला असून, या व्हिडीओमध्ये आकाश ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. ट्रॅक्टर चालवताना तो काम देखील करत आहे. आकाशचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

पोस्ट शेअर करताना आकाशने ‘नाद’ असे कॅप्शन लिहीले आहे. आकाशचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना आर्चीची आठवण झाली आहे. आकाशच्या या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका युजरने आर्चीचा ट्रॅक्टर कधी चोरला?, अशी कमेंट करत आकाशची खिल्ली उडवली आहे.

तर काही युजर आकाशचे कौतुक करत आहेत. आकाश तुझा अभिमान वाटतो, लव्ह यू भावा, तू एवढा मोठा सेलिब्रिटी झालास तरी आपल्या काळ्या आईला विसरला नाहीस, तुझा खूप अभिमान वाटतो मित्रा, एक ही तो दिल है कितनी बार जितोगे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर काहींनी “शेतकरी पुत्र” म्हटले आहे.

दरम्यान, सैराटमधील परशाची आजही कायम आहे. अलीकडेच त्याने ‘झुंड’, ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ मध्ये काम करताना दिसला. ‘घर बंदूक बिरयानी’ या नागराज मंजुळेंच्या सिनेमात ही तो झळकला होता. याशिवाय त्यांने विविध हिंदी वेबसीरिज, चित्रपटांमध्येही काम करुन प्रसिद्धी मिळवली आहे. असे असले तरी तो आपल्या मातीशी असलेली नाळ कधीही विसरत नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह

विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा