येत्या 25 जानेवारी रोजी सुपरस्टार शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित ‘पठाण‘ या सिनेमासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहते शाहरुखला मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत. मात्र, ‘पठाण’ सिनेमाच्या पाच दिवस आधी हिंदी पट्ट्यात साऊथचा असा सिनेमा येतोय, जो पाहून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या शिवाय राहणार नाहीत. कोणता आहे तो सिनेमा चला जाणून घेऊया…
शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमापूर्वी येत असलेला सिनेमा इतर कुठला नसून ‘अखंडा’ (Akhanda) हा आहे. तेलुगू भाषेत 2021मध्ये रिलीज झालेला अखंडा आता वर्षभरानंतर हिंदी व्हर्जनमध्ये चित्रपटगृहात येणार आहे. या सिनेमात अभिनेते नंदमुरी बालकृष्ण (Nandamuri Balakrishna) यांची मुख्य व्यक्तिरेखा असून ते या सिनेमात दुहेरी भूमिका साकारणार आहेत. त्यातील एक पात्र हे अखंडाचे, तर दुसरे पात्र हे मुरली कृष्णचे असणार आहे.
तेलुगू भाषेत हिट झालेला ‘अखंडा’
‘अखंडा’ हा एक हायव्होल्टेज ऍक्शन ड्रामा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन बोयापती श्रीनू यांनी केले आहे. आता डॉ. जयंतीलाल गडा आणि साजिद कुरैशी हा सिनेमा हिंदी भाषेत रिलीज करत आहेत. गुरुवारी (दि. 05 जानेवारी) रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये या सिनेमातील आकर्षणाचा केंद्रबिंदू हे नंदमुरींची अघोरी अंदाजातील वेशभूषा आहे. हा सिनेमातील खूपच महत्त्वाचा भाग आहे. या ट्रेलरला चार तासांच्या आतच 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
अखंडा या सिनेमाने तेलुगू बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमावला होता. तसेच, 120 कोटींच्या आसपास कमाई केली होती. या सिनेमात प्रज्ञा जयसवाल, जगपती बाबू आणि श्रीकांत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा 2021मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा तेलुगू सिनेमा आहे. दुसरीकडे, बालकृष्ण यांच्या कारकीर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमादेखील आहे.
‘कुत्ते’ आणि ‘पठाण’मध्ये ‘अखंडा’
जानेवारी महिन्यात ‘कुत्ते’ आणि ‘पठाण’ हे दोन बहुप्रतिक्षित सिनेमे चित्रपटगृहात रिलीज केले जात आहेत. हे सिनेमे प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणू शकतात. ‘कुत्ते’ (Kuttey) हा सिनेमा 13 जानेवारी आणि पठाण हा सिनेमा 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहेत. अशात 20 जानेवारी रोजी रिलीज होणारा ‘अखंडा’ सिनेमा हा मधल्या दिवसांची कमतरता पूर्ण करू शकतो. मागील काही महिन्यांपासून साऊथचे अनेक सिनेमे हिंदी पट्ट्यात जबरदस्त कमाई करताना दिसले आहेत. त्यामुळे ‘अखंडा’ सिनेमाही हिंदी पट्ट्यात अशीच कामगिरी करेल, असे बोलले जात आहे.
हा सिनेमा हिंदी भाषेत रिलीज करणारे जयंतीलाल गडा म्हणाले की, “प्रेक्षक भव्यदिव्य असणाऱ्या सिनेमांसाठी तरसत आहेत. त्यांना काहीतरी असे पाहायचे आहे, ज्याने डोळ्याचं पारणं फेडले पाहिजे. अखंडा सिनेमा पॅन इंडिया रिलीजवर आम्हाला विश्वास आहे. तसे पाहिले, तर अखंडा हा तेलुगू भाषेत डिज्नी प्लस हॉटस्टारवरही उपलब्ध आहे.”
तिन्ही सिनेमांचे बजेट
‘पठाण’ या सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर त्यात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा 250 कोटींहून अधिक रुपयांच्या किंमतीत बनला आहे. याव्यतिरिक्त ‘कुत्ते’बद्दल बोलायचं झालं, तर 50 कोटींहून अधिक रुपयांमध्ये बनलेल्या या सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, राधिका मदन, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.
दुसरीकडे, तेलुगू भाषेतील ‘अखंडा’ या सिनेमाची निर्मिती जवळपास 60 कोटी रुपयांमध्ये झाली होती. तसेच, साऊथमध्ये या सिनेमाने जवळपास दीडशे कोटी रुपयांची कमाई केली होती. अशात हा सिनेमा हिंदी पट्ट्यात काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (akhanda hindi trailer and release date actor nandamuri balakrishna starrer film releases in cinemas before pathaan)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री एक, बॉयफ्रेंड अनेक! युवराज ते रणबीर, ‘हे’ आहेत दीपिकाचे 6 एक्स
‘अवतार 2’ने मारलं भारतीय बॉक्स ऑफिसचं मैदान, नुकत्याच हिट झालेल्या सिनेमाला पछाडत कमावले ‘एवढे’ कोटी