Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

रोहित शर्मा सोबत प्रेम प्रकरण; आयुष्यभर राहिली विवादांत तरीही नाही मिळालं या अभिनेत्रीला यश…

बॉलिवूड अभिनेत्री सोफिया हयात कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. सोफिया हयात आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. सोफिया हयात बिग बॉस 7 मध्ये देखील वादात सापडली होती.

अभिनेत्री सोफिया हयात क्रिकेटर रोहित शर्मासोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. तीने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले की, रोहित शर्मा आणि तीची लंडनमधील एका हॉटेलमध्ये भेट झाली आणि यादरम्यान दोघांनी एकत्र डान्स केला. मात्र, रोहित शर्माने मीडियासमोर स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांच्यात कोणतेही नाते नाही. तीला आणखी मोठा धक्का बसला होता.

सोफिया म्हणाली होती की, ‘रोहित माझ्यावर मनापासून प्रेम करायचा आणि आम्हा दोघांचे खूप जवळचे नाते होते, आम्ही खूप वेळ एकत्र घालवला, पण एके दिवशी जेव्हा त्याने त्याच्या मित्रांमध्ये त्याची फॅन म्हणून माझी ओळख करून दिली तेव्हा माझे मन दुखले आणि अंतर झाले. 

सोफिया हयातने 2017 मध्ये इंटिरियर डिझायनर व्लाड स्टेनेस्कूशी लग्न केले. जो तीच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. लग्नानंतर लगेचच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. सोफियाने पतीवर अनेक गंभीर आरोप केले. तिने आपल्या पतीविषयी सांगितले, ‘तो भूत होता आणि चोरही होता. ती  म्हणाली की तो इंटिरियर डिझायनर आहे आणि त्याने पॅलेस डिझाइन केले आहेत, तो खोटे बोलला होता, तो कर्जात होता. तो म्हणाला की तो माझ्यावर प्रेम करतो, पण तो खोटा ठरला.

सोफिया हयात बिग बॉस 7 मध्ये सहभागी झाली आहे. तिने कॅश अँड कॅरी, नच ले लंडन आणि अक्सर 2 सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तिला बॉलिवूडमध्ये फारशी ओळख मिळाली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

शाहरुख घरी न आल्यामुळे सलमान खानला आला होता राग; रात्री ३ वाजता सलमानने फोनवर…

 

हे देखील वाचा