Monday, June 23, 2025
Home साऊथ सिनेमा नाचा रे! वडील कमल हासन यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेत्रीने लावले ढोल- ताशावर ठुमके, पाहा जबरदस्त डान्स व्हिडिओ

नाचा रे! वडील कमल हासन यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेत्रीने लावले ढोल- ताशावर ठुमके, पाहा जबरदस्त डान्स व्हिडिओ

तामिळनाडूमध्ये सर्वत्र निवडणुकीचे वातावरण दिसत आहे. मंगळवारी (6 एप्रिल) तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यामध्ये खूपच धावपळ सुरू आहे. अशातच अभिनेते आणि राजकारणी कमल हासन यांनी देखील त्यांच्या पक्षाचा जोरदार प्रचार केला आहे. एवढंच काय तर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री अक्षरा हासन हिने देखील या प्रचारामध्ये सहभाग घेतला आहे.

सोबतच तिची बहीन सुहासिनी हिने देखील तिला या प्रचारामध्ये साथ दिली आहे. या दोघींनीही प्रचारा दरम्यान खूप मस्ती केली आहे. सोबतच जनतेला कमल हासन यांना मतदान करण्यासाठी सांगितले आहे.

या निवडणुकीसाठी अक्षरा आणि सुहासिनीने एक वेगळीच गोष्ट शोधून काढली आहे. त्या दोघींनी रस्त्यावर उतरून ढोल- ताशावर जोरदार डान्स केला आहे. याआधीही देखील अक्षरा तिच्या वडिलांसोबत अनेक प्रचारांमध्ये गेली आहे. तिने या प्रचाराबाबत ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचा हा वेगळाच अंदाज पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत आणि तिच्या या फोटोला आणि व्हिडिओला भरभरून प्रेम देताना दिसत आहेत.

अक्षरा ही कमल हासन यांची छोटी मुलगी आहे, तर श्रुती हासन ही त्यांची मोठी मुलगी आहे. अक्षराने अमिताभ बच्चन आणि धनुष यांच्यासोबत 2015 मध्ये ‘शमिताभ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनतर तिने अनेक हिंदी आणि तमिळ चित्रपटात काम केले. तसेच ती ‘कादराम कोंदण’ या चित्रपटात 2017 मध्ये काम केले. तसेच तिने ‘फिंगरट्रिप’ हा टीव्ही शो देखील केला आहे. अक्षरा ही कमल हासन आणि सारिका ठाकूर यांची मुलगी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे’, मास्क न लावल्यामुळे टीव्ही कलाकारांनी सुनावले कंगना रणौतला खडेबोल

-खबरदार! आमिर खानच्या मुलीचे नाव चुकीचे घ्याल, तर भरावा लागेल ५००० रुपये दंड, व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

-कोरोना विषाणूला गंभीरतेने न घेता जुहू बीचवर लोकांची गर्दी, अभिनेत्रीने ट्वीटमार्फत केली लॉकडाऊनची मागणी

हे देखील वाचा