मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष्य यांच्या अतरंगी रे चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. प्रेमामधील वेडेपणा या ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसून येतो. या ट्रेलरला प्रदर्शित केल्यानंतर लगेच सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळायला सुरूवात झाली आहे. मोठ्या काळानंतर प्रेक्षकांना आणि सिनेप्रेमींना एक नवीन फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच सिनेमाची कथा देखील खूपच अतरंगी आहे. बिहारची मुलगी रिंकू आणि तामिळ मुलगा विशू यांच्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. रिकुचे विषुसोबत जबरदस्तीने पकडून लग्न लावून दिले जाते. हे लग्न दोघानांही मान्य नसते. रिंकू अक्षय कुमारवर प्रेम करत असते. या लग्नानंतर रिंकू आणि विशू ठरवतात की ते दोघे लग्न मानणार नाही आणि त्यांचे पूर्वीचे आयुष्य जगतील. मात्र नेहमीप्रमाणे यातही रिंकू आणि विशू एकमेकांवर प्रेम करू लागतात. मात्र रिंकूला अक्षय देखील पाहिजे असतो आणि विशू देखील पाहिजे असतो. या अनोख्या आणि अतरंगी गोंधळात नक्की काय घडते हे आपल्याला २४ डिसेंबर सिनेमा हॉटस्टारवर स्ट्रीम झाल्यानंतर समजेलच. या सिनेमाचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी सिनेमा ब्लॉकबस्टर ठरणार हे नक्की समजले जात आहे.
तत्पूर्वी आनंद एल राय दिग्दर्शित या सिनेमात अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष्य मुख्य भूमिकेत असून, या सिनेमाला ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे. सिनेमाला ट्रेलर सर्वांनाच आवडत असून, सारा आणि धनुष्य जोडी भाव खाऊन जात आहे. अनेकांना या सिनेमातील कलाकारांच्या वयामधील अंतर देखील खटकत आहेत. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश
-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर
-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट