[rank_math_breadcrumb]

उल्लास ची आठवण…अक्षयशी का जुळली सुनीलची भावनिक नाळ?

सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि अक्षय कुमारचं (Akshay Kumar) ऑनस्क्रीन जसं कमाल जुळतं, तसंच ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. सुनील शेट्टी अक्षयवर खूप प्रेम करतो आणि त्याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी एकत्र अनेक हिट चित्रपट केले आहेत. दोघांची जोडी बॉलिवूडमधली खूप फेमस जोडी मानली जाते. अ‍ॅक्शन आणि कॉमेडी दोन्ही प्रकारात त्यांनी धमाल केली आहे. फक्त पडद्यावरच नाही, तर दोघं खऱ्या आयुष्यातही खूप चांगले मित्र आहेत.सुनील शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की,ते अक्षयकडे भावनिकदृष्ट्या का आकर्षित आहेत आणि त्यांचं नातं इतकं घट्ट का आहे यामागचं कारण काय आहे,हे त्यांनी उघड केलं.

इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टीने अक्षय कुमारबद्दलच्या आपल्या भावना शेअर केल्या.त्यांना विचारलं,”आजही तुमचं आणि अक्षयचं भाऊसारखं नातं आहे का?” यावर सुनील शेट्टी म्हणाले,”होय,अक्षय मला माझ्या चुलत भावाला उल्लासला खूप आठवण करून देतो. त्यामुळेच मी त्याच्याशी इमोशनली खूप अटॅच झालो आहे.त्याचं शरीर, त्याचा लूक अगदी तरुणपणीसुद्धा तो जसा वागत असे,ते सगळं मला उल्लाससारखंच वाटायचं. ‘वक्त हमारा है’ चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच मी त्याला म्हटलं होतं ‘तू जसा आहेस, मला माझ्या भावासारखाच वाटतोस’”.

यापूर्वी सुनील शेट्टीनं रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की तो आपल्या चुलत भावाला, उल्लासला खूप जवळचा होता. उल्लासचा अपघातात लहान वयातच मृत्यू झाला होता आणि त्याचा सुनीलला खूप मोठा धक्का बसला होता.सुनील म्हणाला होता की,उल्लासनेच त्याला पहिलं मॉडेलिंगचं काम मिळवून देण्यासाठी मदत केली होती, त्यामुळे त्याचं जाणं त्याच्यासाठी खूप दुखद होतं.

1990 च्या सुरुवातीला अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी एकत्र चित्रपट करायला सुरुवात केली आणि लवकरच ते बॉलीवूडमधली सगळ्यात हिट जोडी बनले. त्यांनी सुरुवात केली अ‍ॅक्शन चित्रपटांनी ‘मोहरा’ आणि ‘वक्त हमारा है’ यासारख्या थरारक चित्रपटांनी. पण जेव्हा त्यांनी कॉमेडीमध्ये हात मारला ना, तेव्हा मात्र प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतलं! ‘हेरा फेरी’, ‘आवारा पागल दीवाना’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘दे दना दन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांची टाइमिंग, मस्ती आणि धमाल पाहून चाहत्यांना मजाच यायची. त्यांची केमिस्ट्री एकदम झकास!

आता हे दोघं पुन्हा धमाका करायला सज्ज आहेत. अहमद खानच्या ‘वेलकम टू द जंगल’ या कॉमेडी चित्रपटात ते दिसणार आहेत. त्यांच्या सोबत परेश रावल, संजय दत्त, लारा दत्ता, रवीना टंडन, दिशा पटानी आणि अरशद वारसी यांसारखे तगडे कलाकार आहेत. हा चित्रपट वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार आहे.तसंच, चाहत्यांनी ज्याची आतुरतेने वाट पाहिली आहे असा ‘हेरा फेरी ३’ हाही चित्रपट येतोय, त्यातूनही ही सुपरहिट जोडी मोठ्या पडद्यावर परत येणार आहे!

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा  

थिएटरसारखा चित्रपट अनुभवायचं,यूट्यूबवरही तिकीट काढा!