Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड लग्नाच्या पहिल्या रात्रीच अक्षय कुमारला समजलं होतं पत्नी ट्विंकलचं ‘हे’ सत्य, अभिनेत्याने सर्वांसमोर केला खुलासा

लग्नाच्या पहिल्या रात्रीच अक्षय कुमारला समजलं होतं पत्नी ट्विंकलचं ‘हे’ सत्य, अभिनेत्याने सर्वांसमोर केला खुलासा

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना इंडस्ट्री मधील ‘क्यूट कपल’ म्हणून ओळखले जातात. एखाद्या सिनेमाला ही लाजवेल अशी त्यांची प्रेमकथा आहे. परंतु एका शोमध्ये अक्षय कुमारला त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारलं असता, अभिनेत्याने त्याला पत्नी ट्विंकलबद्दलचं एक सत्य लग्नाच्या पहिल्या रात्रीच समजलं असा अजब दावा केला आणि सगळेच अवाक् झाले. काय आहे ते सत्य चला जाणून घेऊ.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे बंद असलेले थिएटर पुन्हा उघडणार असल्याने अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘सुर्यवंशी’ चित्रपटही दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेल्या कार्यक्रमात अक्षय कुमारने या गोष्टीचा खुलासा केला. (akshay kumar and wife twinkle khanna relationship

नुकतेच अक्षय कुमार, पत्नी ट्विंकल खन्नासोबत कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी अर्चना पुरणसिंग यांनी अक्षय कुमारला घरी सुद्धा अशीच राजा सारखी जीवनशैली जगता का? असे विचारले असता, त्याने ‘अजिबात नाही’ असं सांगितलं. त्याचवेळी अर्चना पुरणसिंग यांनी अक्षय कुमारला वैवाहिक आयुष्याबद्दल विचारताना, तुम्हा दोघांच्या पती पत्नीच्या भांडणात शेवटी विजय कोणाचा होतो? असे विचारले आणि अक्षयने पटकन ट्विंकलकडे बोट दाखवले. पुढे अक्षयने ट्विंकलबद्दल बोलताना. “मी तिच्यासोबत भांडणात कधीच जिंकू शकत नाही” असेही सांगितले. शिवाय ही गोष्ट त्याला लग्नाच्या पहिल्या रात्रीच समजल्याचा खुलासा सुद्धा केला. ज्यामुळे सगळे प्रेक्षक अवाक् झाले. अक्षय कुमारच्या या बोलण्यावर शेजारी बसलेल्या ट्विंकलचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता.

दरम्यान अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची इंडस्ट्रीमधे कायम चर्चा असते. सकाळी ४ पासून अक्षय कुमार त्याच्या दिनचर्येला सुरुवात करतो. असं म्हटलं जातं की, इंडस्ट्रीमधील पार्ट्यांमधे अक्षय कुमार कधीच हजेरी लावत नाही. त्याच्या या चाकोरीबद्ध जीवनशैलीचं पत्नी ट्विंकल सुद्धा समर्थन करते. अक्षय आणि ट्विंकलला दोन गोंडस मुलं देखील आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा