Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड काश्मीर फाईल्स सिनेमा लावण्याची मागणी करत अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडेचा शो गोंधळ घालत पाडला बंद

काश्मीर फाईल्स सिनेमा लावण्याची मागणी करत अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडेचा शो गोंधळ घालत पाडला बंद

मागील काही दिवसांपासून विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत लोकांची प्रशंसा मिळवली आहे. या सिनेमावरून देशात चांगलेच राजकारण देखील तापले अनेकांनी या चित्रपटावर आरोप देखील केले, मात्र या सिनेमाची यशस्वी घोडदौड चालूच आहे. ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अमानुष अत्याचारावर आधारित असलेला हा सिनेमा काश्मीरचे भयावह सत्य सर्वांसमोर मांडतो. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही सिनेमाने चांगलीच पकड ठेवली असून, या चित्रपटासमोर दुसरा कोणताही सिनेमा टिकाव धरत नसल्याचे दिसत आहे. नुकताच अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

‘बच्चन पांडे’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारने देखील या सिनेमाचे कौतुक केले होते. कलाकार आणि लोकांकडून सिनेमाला मिळणार प्रतिसाद आणि त्यांच्या प्रतिक्रिया यांमुळे प्रेक्षक ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाकडे वळताना दिसत आहे. यातच अक्षयच्या फॅन्सला मात्र निराशेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये बच्चन पांडे सिनेमाची स्क्रीनिंग थांबवून तिथे ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा लावण्याची मागणी करत आहे.

ओडिशाच्या सिनेमाहॉलमध्ये देवांचे स्कार्फ बांधून काही लोकांनी चित्रपटगृहात प्रवेश केला आणि ‘बच्चन पांडे’ सिनेमाची स्क्रीनिंग थांबवली. एवढेच नाही तर पाणी लोकांना धमकी देखील दिली. एका माहितीनुसार त्या हॉलमध्ये असलेल्या व्यक्तीने सांगितले की, १० ते १०० लोकांचा ग्रुप त्या चित्रपटगृहात आला आणि गोंधळ घातला. त्या चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी काश्मीर फाईल्स सिनेमातील एक सीन कट केल्याचा देखील दावा त्या ग्रुपने केला.

‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाने केवळ ११ दिवसांमध्ये १८० कोटी रुपये कमावले असून अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ने पहिल्या आठवड्यात ३४ कोटींची कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा