Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड ‘महाराष्ट्राने तुला खूप काही दिले आहे, परतफेड करण्याची वेळ आलीय,’ पाहा कुणी दिलाय अक्षयला हा मोलाचा सल्ला

‘महाराष्ट्राने तुला खूप काही दिले आहे, परतफेड करण्याची वेळ आलीय,’ पाहा कुणी दिलाय अक्षयला हा मोलाचा सल्ला

संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसेच रुग्णांसाठी वैद्यकीय सोयी सुविधांचा तुटवडा देखील जाणवत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची कमतरता भासत आहे. वेळेत सुविधा‌ न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण जात आहे. अनेकजण रुग्नांना मदत देखील करत आहे. यातच बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार याने कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुन्हा एकदा हात सरसावले आहे.

अक्षय कुमारने माजी क्रिकेटर आणि दिल्लीतील लोकसभा सदस्य गौतम गंभीर यांच्या फाउंडेशनमध्ये एक कोटी रुपये जमा केले आहे. यातून कोरोना रुग्णांना मदत केली जाणार आहे. याची माहिती स्वतः गौतम गंभीर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.

गौतम गंभीरने लिहिले आहे की, ” या कसोटीच्या काळात प्रत्येकाची मदत ही रुग्णांसाठी एक आशेचा किरण घेऊन येणार आहे. गरजू कोरोना रुग्णांसाठी जेवण, औषधे आणि जेवणासाठी या रकमेचा उपयोग केला जाईल. गौतम गंभीर फाउंडेशनला एक कोटी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. देव तुमचं भलं करो.”

अक्षय कुमारने गौतम गंभीरच्या या ट्विटला रिप्लाय दिला आहे की,” गौतम गंभीर हा खूप अवघड काळ चालू आहे. मला आनंद होत आहे की, मी तुम्हाला मदत करू शकलो. मला आशा आहे की, आपण लवकरच या संकटावर मात करून यातून बाहेर पडू. सुरक्षित रहा.”

 

असे असले तरी काही चाहत्यांना अक्षयचे गौतम गंभीर फाऊंडेशनला पैसे देणे रुचले नाही. त्यांनी अक्षयचा ट्विटरवर चांगलाच समाचार घेतला आहे. ‘तुला महाराष्ट्राने खूप काही दिले आहे. आता परतफेड करण्याची वेळ आली आहे.’ असे एका युजरने म्हटले आहे.

देशात कोरोनाच्या पहिली लाटेत देखील अक्षय कुमारने अनेक वेळा मदत केली होती. त्याने पीएम केअर फंडला 25 कोरीचे योगदान दिले होते. त्यानंतर बृहन्मुंबई मुन्सीपल कॉरपोरेशनला पीपीई किटसाठी 3 कोटी रुपये दिले होते. कोरोना व्यतिरिक्त देखील अक्षय कुमार जिथे कुठे मदतीची गरज असते तिथे धावून गेला आहे.

हे देखील वाचा