बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या सुरक्षेसाठी असलेली कार नुकतीच मुंबईत झालेल्या भीषण रस्ते अपघातात सापडली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. हा अपघात मुंबईतील जुहू परिसरात थिंक जिमजवळ झाला. ही अक्षय कुमार यांच्या एस्कॉर्ट टीमची कार होती, ज्यामध्ये त्यांचे सुरक्षारक्षक प्रवास करत होते. अपघातात कारचा चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना सोमवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एकूण दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातग्रस्त वाहन बाजूला हटवण्यात आले. अपघातात कारचालकासोबतच ऑटो रिक्षामधील दोन प्रवासीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरील दृश्यांवरून अपघात किती भीषण होता, याचा अंदाज येतो. व्हिडिओमध्ये सुरक्षा कार उलटलेली दिसत असून ऑटो रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात ऑटो रिक्षाचे अक्षरशः परखच्चे उडाले आहेत. मात्र, एवढ्या जोरदार धडकेनंतरही सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. टक्कर इतकी भीषण होती की काही काळासाठी रिक्षाचालक आणि प्रवासी रिक्षामध्ये अडकले होते, मात्र तात्काळ मदत मिळाल्याने त्यांना बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, अक्षय कुमार (Akshay Kumar)आणि पत्नी ट्विंकल खन्ना हे त्यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त परदेशात सुट्टी घालवून नुकतेच मुंबईत परतले होते. मुंबईत परतल्यानंतर काही तासांतच हा अपघात घडल्याची माहिती आहे. या जोडप्याने त्यांच्या 25व्या वेडिंग अॅनिव्हर्सरीनिमित्तील वेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यांना चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. यापूर्वी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारसोबत पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडिओही शेअर केला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बोल्ड अँड ब्युटीफुल! मलायका अरोराचा नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल










