Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड व्हिडिओ: अनेक वर्षांनंतर अक्षय कुमारचा फर्स्ट स्क्रीन टेस्ट लूक व्हायरल, स्वत: अभिनेत्याने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

व्हिडिओ: अनेक वर्षांनंतर अक्षय कुमारचा फर्स्ट स्क्रीन टेस्ट लूक व्हायरल, स्वत: अभिनेत्याने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. अक्षय कुमारचे आज मोठ्या कलाकारांमध्ये नाव घेतले जाते. खूप मेहनत करून आज अक्षयने त्याचे नाव कमावले आहे. अक्षय कुमारचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अक्षय बर्‍याचदा सामाजिक विषय चित्रपटात मांडताना दिसतो. अशातच आता अक्षय कुमारचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अक्षय कुमारने पहिल्या चित्रपटानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अक्षय कुमार जेव्हा सिनेजगतात आला, तेव्हापासूनच तो मार्शल आर्टमध्ये पारंगत होता होता. अक्षय कुमारची ऍक्शन हिरो म्हणून ओळख होती. अक्षयचा पहिला स्क्रीन टेस्ट लूकचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

अक्षय कुमारने १९९१ साली ‘सौगंध’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. यात आता अक्षयचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. अचानक या अभिनेत्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते वेडे होत आहेत.

https://twitter.com/Khurafati_Jaat_/status/1373647126685618176

व्हायरल होत असलेल्या अक्षय कुमारच्या व्हिडिओमध्ये, तो फारुख शेखच्या चॅट शो ‘जीना इसी का नाम है’ मध्ये दिसत आहे. यात अभिनेता पाहुणा म्हणून दाखल झाला होता. येथे अक्षयला त्याच्या पहिल्या स्क्रीन टेस्टचा व्हिडिओ दाखविण्यात आला होता. व्हिडिओमध्ये अक्षय मार्शल आर्ट करताना कसा दिसत आहे.

याव्यतिरिक्त तो अभिनय सादर करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री नगमा देखील त्याच्यासोबत दिसली आहे. दोघेही एकत्र रोमँटिक सीन करताना दिसतात. खास गोष्ट अशी की, अक्षय कुमार फारूकच्या शोमध्ये आपला स्क्रीन टेस्ट व्हिडिओ पाहून चकित झाला होता. तसेच हसून म्हणाला होता की, ‘केस किती मोठे होते.’

हा व्हिडिओ संपल्यानंतर, अक्षय कुमार म्हणतो की, ‘मला वाटते कामावरून काढून टाकले जाईल.’ अक्षय कुमारचा हा व्हिडिओ आता पुन्हा चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहते अक्षय कुमारची जोरदार प्रशंसा करत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर अक्षय कुमारकडे सध्या भरपूर चित्रपट आहेत. अक्षय कुमार लवकरच ‘सूर्यवंशी’, ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘रामसेतू’ आणि ‘बेल बॉटम’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. २०२० मध्ये प्रदर्शित झालेला अक्षय कुमार याचा सूर्यवंशी हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्नत झुबेर रहमानीचा डान्स व्हिडिओ व्हायरल; पण अभिनेत्रीच्या आईनेच वेधले नेटकऱ्यांचे लक्ष!

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल

हे देखील वाचा