ऍक्शन असो, ड्रामा असो, रोमान्स असो, विनोद असो किंवा एखादा सामाजिक संदेश द्यायचा असो. या सगळ्यात तरबेज असलेला बॉलिवूडमधील सुपरस्टार म्हणजे अक्षय कुमार. अक्षयने त्याच्या करिअरची सुरुवात 90 च्या दशकात केली होती. त्यानंतर त्याला काही दिवसातच बॉलिवूडमधील ‘खिलाडी’ हे नाव मिळाले. जबरदस्त ऍक्शनच्या जोरावर त्याने त्याचे नाव कमावले आहे. 90 च्या दशकाच्या मध्यापर्यंत त्याचे नाव अव्वल अभिनेत्यांच्या यादीमध्ये होते. परंतु त्यानंतर त्याचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले.
अक्षय कुमार हा 1996 मध्ये अभिनेत्री रवीना टंडनला डेट करत होता. त्यावेळी तो खूप सिरियस रिलेशनमध्ये होता. याच वर्षी अक्षय कुमारचा ‘खिलाडियों का खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत रवीना टंडन आणि रेखा होती. ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी अक्षय कुमार 28 वर्षांचा, तर रेखा 41 वर्षांच्या होत्या. त्यावेळी अक्षय आणि रेखाचे अनेक इंटिमेट सीन शूट केले होते. या सगळ्यामुळे रवीना खूपच अस्वस्थ झाली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेखा आणि अक्षय हे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. ती अक्षय कुमारसाठी दररोज जेवण बनवून आणत असे. तसेच सेटवर देखील जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबत घालवत असे. रवीना टंडनला या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या, तेव्हा तिने रेखाला स्पष्ट शब्दात अक्षयपासून दूर राहण्यास सांगितले होते.
अक्षय कुमारवर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींचे मन तोडण्याचे आरोप लागले आहेत. त्याच्या करिअरला सुरुवात केल्यानंतर 10 वर्षापर्यंत त्याने अनेक अभिनेत्रींना डेट केले. आयशा जुल्का, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी अशा अनेक अभिनेत्रींच्या नावाचा या यादीत समावेश होती. परंतु जेव्हा अक्षय कुमारची नजर ट्विंकल खन्नावर पडली, तेव्हा मात्र तो एकाच नजरेत तिच्या प्रेमात पडला आणि तिलाच आयुष्याची अर्धांगिनी बनवले. त्यांच्या लग्नानंतरही अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्या अफेयरच्या बातम्या येत होत्या.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक
-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर










