Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अवतरणार अक्षय कुमार, पाहायला मिळणार खिलाडीचा मराठमोळा अंदाज

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ हा शो चांगलाच गाजत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात या शोची ख्याती पसरली आहे. सुरुवातीला केवळ मराठी कलाकार या शोमध्ये येत होते. परंतु आता हिंदी कलाकार देखील त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ आणि रोहित शेट्टी हे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आले आहेत.

ते तिघेही त्यांच्या ‘सुर्यवंशी’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले आहेत. येत्या सोमवारी (१ नोव्हेंबर) रोजी हा भाग आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. याची काही झलक निलेश साबळे हे त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. (Akshay Kumar, Jackie Shroff and Rohit Shetty will come on chala hava yeu dya det for pramotion of suryvanshi movie)

निलेश साबळेने सोशल मीडियावर अक्षय कुमारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “आ रही है पुलिस, सुपरस्टार खिलाडी येणार, आपल्या मंचावर दंगा होणार, दिवाळीचा सुपरहिट धमाका, या सोमवार ते बुधवार. ‘सुर्यवंशी’ची ऍक्शन आणि ‘चला हवा येवू द्या’ची कॉमेडी ऍक्शन. जाळ अन् धूर संगच. पहिल्यांदाच पाहा अक्षय कुमार यांचा मराठमोळा अंदाज.”

या सोबत त्याने या एपिसोडमधील एक सीन देखील शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही हसणे आवरणार नाही. हा व्हिडिओ पाहून आपण नक्कीच अंदाज लावू शकतो की, येत्या आठवड्यात ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आपल्याला धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी हे दोघे झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील हजेरी लावणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निलेश साबळेचा होणार पत्ता कट, ‘ही’ अभिनेत्री करणार ‘चला हवा येऊ द्या’चे सूत्रसंचालन?

-शिव ठाकरे अन् जुईली वैद्यच्या डान्सवर टायगर श्रॉफही झाला फिदा, कमेंट करत म्हणाला…

-भारीच की! ‘ही’ अभिनेत्री असणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री

हे देखील वाचा